Thursday 19 May 2016

शिवाजी विद्यापीठ आयोजित रोजगार मेळाव्यास उत्तम प्रतिसाद





कोल्हापूर, दि.16 मे - शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती प्लेसमेंट कक्ष आणि आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागामध्ये जॉब फेअर - 2016 चे आयोजन करण्यात आले होते. सर्व शाखांच्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आयोजित रोजगार मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. विविध शाखांच्या दीड हजार विद्यार्थींनी मुलाखती दिल्या. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोल्हापूर शहरामध्येच रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली.
दरम्यान, रोजगार मेळाव्यास विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.देवानंद शिंदे, बीसीयुडीचे संचालक, डॉ.डी.आर. मोरे, प्र.कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी भेट देवून पहाणी केली. तसेच, कुलगुरु प्रा.डॉ.देवानंद शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
 
नेटक्या नियोजनामुळे रोजगार मेळाव्यामध्ये सर्वत्र उल्हासी वातावरण होते. या रोजगार मेळाव्यामध्ये 22 आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सॉफ्टवेअर, मार्केटिंग, नेटवर्कींग, वेब डिझायनिंग, डाटा एंट्री, ग्राफीक्स, एच आर, विक्री, सेवा इ. विविध क्षेत्रांमधील नोकरीची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली. मुलाखतीचा निकाल दोन दिवसात विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याची माहिती मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षाचे समन्वयक प्रा.पी.एन.भोसले यांनी दिली.

No comments:

Post a Comment