Thursday 4 August 2016

मीठाला जागणे प्रतिष्ठेचे मानणाऱ्यांचा होता 'तो' काळ: प्रा.स्टुअर्ट गॉर्डन




कोल्हापूर दि. ऑगस्ट: जात, धर्म यापेक्षाही मीठाला जागणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाण्याचा ऐतिहासिक वारसा या भारतभूमीला लाभलेला आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाचे प्रा.स्टुअर्ट गॉर्डन यांनी आज येथे केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 'ग्यान' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत विद्यापीठाच्या व्हर्च्युअल क्लासरुममध्ये आयोजित 'ठराव्या शतकातील दख्खन' या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. 'ग्यान' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेली ही तिसरी व्याख्यानमाला आहे.
प्रा. गॉर्डन म्हणाले, आठ हजार वर्षांपूर्वीपासून मट, मासे टिकवून ठेवण्यासाठी मीठ उपयोगात आणले जात होते.  इतिहास काळात मीठाचा उपयोग फक्त जेवणामध्ये होत से, तर आपल्या मातीशी एकनिष्ठ, इमानी राहण्यासाठी सैनिकांना मी दे शपथ दिली जात असे. ही मीठाला जागण्याची परंपरा केवळ मध्ययुगीन भारतातच नव्हे, तर मध्य आशियामध्येही प्रचलित असल्याचे दिसते. 'बाबरनामा'मध्येही पराभूत सैनिकांना आपल्या सैन्यात नव्याने प्रवेश देताना मीठाला जागण्याची शपथ देण्याची परंपरा प्रचलित असल्याचे संदर्भ मिळतात. मिर्झाराजे जयसिंग, शहाजी महाराज, शिवाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या काळातली या संदर्भातील अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले, राजघराण्यांशी निगडित असलेली मानाच्या वस्त्रांची परंपरा किंवा पद्धती केवळ मध्ययुगापुरती मर्यादित नसून प्राचीन काळापासून चालत आल्याचे दिसते. त्याचा संबंध राजनिष्ठेशी असून भारतापासून मध्य आशियापर्यंत त्याचे संदर्भ आढळून येतात.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्तमानकाळ समजून घेणे आवश्यक आहे. इतिहासाकडे पाहताना समग्र दृष्टीने पाण्याबरोबरच इतिहास समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. परदेशी अभ्यासकांनी वैज्ञानिक दृष्टीने इतिहासाचे संशोधन केले. त्यामुळे आपण त्यांच्याकडे कुतूहलाने, आदराने पाहतो. 
'ग्यान'चे समन्वयक डॉ. आर.के. कामत यांनी स्वागत केले. डॉ. अवनिश पाटील यांनी पाहुण्यांचा परिच करुन दिला.तिहास विभागप्रमुख डॉ. पद्मजा पाटील यांनी कार्यशाळेचे महत्त्व वि केले. यावेळी ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर यांच्यासह संजय पाटील, जगदीश पाटील, शिक्षक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment