Friday 18 May 2018

जिऑइन्फॉर्मेटिक्सच्या वीस विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांत संधी


शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील जिऑइन्फॉर्मेटिक्स अभ्यासक्रमाच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ.एच.एन. मोरे, डॉ. एस.एस. पन्हाळकर आदी.


सातत्याने शंभर टक्के प्लेसमेंटची भूगोल अधिविभागाची कामगिरी

कोल्हापूर, दि. १८ मे: शिवाजी विदयापीठाच्या भूगोल अधिविभागातील जिओइन्फॉर्मेटिक्स या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या वीस विदयार्थ्यांची जेनेसिस आणि आय.एल. अँड एफ.एस. एन्व्हायर्नमेंट या आंतरराष्ट्री कंपन्यांतर्फे नुकतीच निवड करण्यात आली. ही माहिती भूगोल अधिविभागाचे प्रमुख डॉ. एस.एस. पन्हाळकर यांनी दिली.
डॉ. पन्हाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूगोल अधिविभागा पी.जी. डिप्लोमा इन जिओइन्फॉर्मेटिक्स् (भौगोलिक माहिती प्रणाली) हा अभ्यासक्रम सन २००८ पासून चालविला जात आहे. या अभ्यासक्रमामध्ये डिजीटल इमेज प्रोसेसिंग, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, रिमोट सेन्सिंग अँड सर्व्हेईं त्यादी महत्त्वाचे विषय शिकविण्यात येतात. सदर अभ्यासक्रम हा अत्याधुनिक उपकरणे अद्यावत सॉफ्टवेअर्सच्या सहाय्याने शिकविण्यात येतो. भौगोलिक माहिती प्रणालीचा अभ्यासक्रम पूर्णतः संगणक प्रणालीवर आधारित असून पर्यावरणाचा अचूक वेध घेण्यासाठी तो महत्वपूर्ण ठरतो. या तंत्रज्ञानामार्फत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, भू-मापन, जलव्यवस्थापन, रस्ते बांधणी, वाहतूक व्यवस्थापन, नागरीकरण, पूरनियोजन, प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन इत्यादी गोष्टीचा अचूक अभ्यास व नियोजन करता येते. इतकेच नव्हे; तर, कोल्हापूरसा़रख्या शहरात देखील या प्रणालीचा उपयोग प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन, जमिनीचे सर्वक्षण अणि काळम्मावाडी धरणापासूनच्या पाईपलाईनचे सर्वक्षण आदींसाठी केला गेलेला आहे.
भूमापन, भू-सर्वेक्षण, हवामान सर्वेक्षण इत्यादी क्षेत्रांत अत्यंत प्रभावी भूमिका बजावत असणाऱ्या जिओइन्फॉर्मेटिक्स या आधुनिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के रोजगार संधी उपलब्ध होते आहे. यंदाही अधिविभागातील वीस विद्यार्थ्यांची निवड जेनेसिस (मुंबई) आणि  आय.एल. अँड एफ.एस. एन्व्हायर्नमेंट (मुंब) या आंतरराष्ट्री कंपन्यामध्ये झालेली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे अशी: क्षय बाळासाहेब शिंदे, उत्तम भीमराव गोरे, सपना सुनिल भाराडे, सुविज्ञा सुनिल पाटील, रामेश्वर उत्तरेश्वर धनावे, संजोत शिवाजी चोरगे, शितोष पांडुरंग मगदूम, साबिहा मेहबुब बागवान, सिद्धेश्वर दशरथ घुगे, सागर शरद खता, साग अशोक कोरवी, ओंकार रामदास परब, विजय आप्पासाहेब पाटील, युवराज अशोक पाटील, शनिश्वर दत्तात्रेय बनसोडे, यूर राजाराम गडकर, स्नेहल कृष्णा औंधकर, सचिन नंदा मोहिते, अक्षय रामचंद्र सोवंडे, चारूशिला संजीव देसाई. या विद्यार्थ्यांना अधिविभाग प्रमुख डॉ. एस.एस. पन्हाळकर, प्रा. अभिजित पाटील, डॉ. पी.टी पाटील प्रा. व्ही.ए. चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

मिळालेल्या संधीचे सोने करा: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
जिऑइन्फॉर्मेटिक्सच्या या यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत विभागातील शिक्षकांनी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के यांची भेट घेतली. यावेळी उपकुलसचिव डॉ. जी.एस. कुलर्णी उपस्थित होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, जिऑइन्फॉर्मेटिक्स हा अत्यंत आधुनिक अभ्यासक्रम असून या क्षेत्रामध्ये अनेक नव्या प्रकारच्या रोजगार संधी निर्माण होत आहेत. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सातत्याने शंभर टक्के प्लेसमेंट मिळत आहे, यावरुन त्याचे महत्त्व अधोरेखित होते. सदर विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करावे, त्याचबरोबर संबंधित कॉर्पोरेट कंपनीमध्ये उपलब्ध असलेल्या या क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर यांचाही अभ्यास करावा आणि आपले करिअर उत्तम प्रकारे घडवावे आणि शिवाजी विद्यापीठाचा लौकिक उंचवावा, असे आवाहनही केले.

जी.आय.एस. क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या
जेनेसिस इंटरनॅशनल ही भारतातील जी.आय.एस. क्षेत्रातील कंपन्यांत अग्रगण्य आहे. या कंपनीचे काम भारता मुंबई आणि हैद्राबाद या दोन ठिकाणाहून चालते. ही कंपनी प्रामुख्याने अत्याधुनिक मॅपिं सर्वेक्षण, लायडर तंत्रज्ञान आणि जिओस्पॅशिअस सर्व्हिसेस या क्षेत्रात काम करते. आय.एल. अँड एफ.एस. एन्व्हायर्नमेंट ही कॅडॅस्ट्रल मॅपिंग, वेस्ट मॅनेजमेंट, जिओस्पॅशिअल सोल्युशन या क्षेत्रात काम करते.

10 comments:

  1. Congratulations to SUK GEOG. DEPT.!!

    ReplyDelete
  2. Congrats to all Geography Faculty members of Shivaji University keep it up All the best Wishes Prin Adavitot

    ReplyDelete
  3. Awesome ...cong congratulations all students and all staff.

    ReplyDelete
  4. अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांचे आणि भूगोल विभागाचे

    ReplyDelete
  5. Great work Dr.Panhalkar sir

    ReplyDelete
  6. congratulation prof.(dr) s.s. Panhalkar sir and team

    ReplyDelete