Thursday, 26 December 2024

संख्याशास्त्र अधिविभागातून पहिला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पीएच.डी.

 

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील पहिले आंतरराष्ट्रीय पीएचडी धारक विद्यार्थी महम्मद खादीम शन्शुल यांनी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी डॉ. शशीभूषण महाडिक आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.


कोल्हापूर, दि. २६ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातून आज पहिल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याने पीएच.डी. पदवी प्राप्त केली. महम्मद खादीम शन्शुल असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इराकचा नागरिक आहे.

श्री. शन्शुल यांनी संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली अॅडव्हान्स्ड नॉन पॅरामेट्रिक कंट्रोल चार्ट्स या विषयावर शिवाजी विद्यापीठास प्रबंध सादर केला. संख्याशास्त्र विषयाचे प्राध्यापक असणारे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी महम्मद शन्शुल यांचे विशेष अभिनंदन केले.

शिवाजी विद्यापीठात वीर बाल दिवस

 




कोल्हापूर, दि. २६ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठात आज वीर बाल दिवसानिमित्त हुतात्मा बालकांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र- कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

गुरु गोविंद सिंह यांच्या बाबा जोरावर सिंह (९ वर्षे) आणि बाबा फतेह सिंह (७ वर्षे) या दोन लहान मुलांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक म्हणून २६ डिसेंबर "वीर बाल दिवस" म्हणून साजरा केला जातो. सन 1705 मध्ये मुघलांनी या बालकांना त्यांच्या दोन मोठ्या भावांसह मारले होते. गुरू गोविंद सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांचे शौर्य आणि आदर्श यांचे या दिवशी स्मरण केले जाते.

या अभिवादन प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कैलास सोनवणे, जैवरसायनशास्त्र अधिविभागाच्या डॉ. ज्योती जाधव, डॉ. पद्मा दांडगे, डॉ. कल्याणराव गरडकर, डॉ. पंकज पवार, डॉ. एस. एस. काळे यांच्यासह संशोधक विद्यार्थी, अधिकारी व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

 

Monday, 23 December 2024

शिवाजी विद्यापीठात १ जानेवारीपासून 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' अभियान

 कोल्हापूर, दि. २३ डिसेंबर: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठात दिनांक 1 ते 15 जानेवारी, 2025 कालावधीत 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यापीठांमध्ये तसेच विविध महाविद्यालयांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावे या अनुषंगाने  हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पुस्तकांचे सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा आयोजन, ग्रंथ प्रदर्शन, वाचन संवाद कार्यक्रमांतर्गत लेखकांचा वाचकांशी संवाद इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. 
 दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर आधारित निबंध स्पर्धा तसेच कथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त निबंध अथवा कथन यांना विद्यापीठाच्या वतीने प्रशस्तीपत्रही देण्यात येणार आहे. या उपक्रमापूर्वी सर्व ग्रंथालयांमध्ये स्वच्छता मोहीमही राबवण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ  26 जानेवारी, 2025 रोजी विद्यापीठात संपन्न होणार आहे. 
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव, डॉ. विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  हे अभियान संपन्न होणार आहे. या अभियानात शिवाजी विद्यापीठातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि त्यांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यापीठाच्या वतीने त्यांचा सहभाग जास्तीत जास्त व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी दिली आहे.

Sunday, 22 December 2024

‘आविष्कार’मध्ये राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी विजेते

 

आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवाच्या विजेतेपदाचा चषक कासेगावच्या राजारामबापू पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या चमूला प्रदान करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

आविष्कार संशोधन स्पर्धेतील सादरीकरण पाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात दोन्ही दिवस विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती.


कोल्हापूर, दि. २२ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठात पार पडलेल्या दोनदिवसीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये आज कासेगाव येथील राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीने विजेतेपद पटकावले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचे उद्दीष्ट बाळगून दरवर्षी आविष्कार संशोधन महोत्सव आयोजित करण्यात येतो. जिल्हास्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेच्या फेऱ्यांनंतर विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सव राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पार पडला. विद्यार्थी विकास विभाग आणि रसायनशास्त्र अधिविभागातर्फे महोत्सवाचे संयोजन करण्यात आले.

पदवी स्तरीय, पदव्युत्तर स्तरीय आणि पीएच.डी. संशोधन स्तरीय अशा तीन गटांमध्ये संशोधकांनी या दोन दिवसांत आपले प्रकल्प पोस्टर व मॉडेल्सच्या स्वरुपात सादर केले. मानव्यशास्त्र, भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, शुद्ध विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय आणि औषधनिर्माण या सहा श्रेणींमध्ये संशोधक विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादरीकरण केले.

काल झालेल्या पदव्युत्तर गटातील स्पर्धेमध्ये १९३ संशोधक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यांचा निकाल गटनिहाय अनुक्रमे पुढीलप्रमाणे:

मानव्यशास्त्र, भाषा व ललित कला: १. साक्षी किरण दाताळ (औद्योगिक रसायनशास्त्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), २. सुशांत केदारी पाटील (संख्याशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), ३. अनुष्का महेश कारंडे (राज्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ) ४. प्रियांका सुरेश ढेबे (किसन वीर महाविद्यालय, वाई), ५. मुकेश सर्जेराव हक्के (यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी),

वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा: १. आदित्य संदीप बरगे (डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगाव) २. साक्षी राजेंद्र शेडगे (लालबहादूर शास्त्री कॉलेज,सातारा) ३. भार्गवी विजय कुंभार (कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पलूस) ४. वैष्णवी धनाजी पाटील (श्री शिव शाहू महाविद्यालय, सरुड), ५. महेश मनोहर मोरे (संख्याशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ)

शुद्ध विज्ञान: १. ओंकार संजय सुतार (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर), २. सुषमा राजीव देशमुख (जैवतंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ),  ३. राजशेखर अर्जुन यादव (औद्योगिक रसायनशास्त्र,शिवाजी विद्यापीठ), ४. स्वप्नील विकास पाटील (यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय, कराड), ५. नंदिनी प्रमोद डोळसे (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड),

कृषी आणि पशु विज्ञान: १. गजानन गणेश देशमाने (आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, सांगली), २. तनुजा शिवाजी कदम (डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी महाविद्यालय, कसबे डिग्रज), ३. ज्ञानेश्वर महादेव माने (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), ४. सत्यम प्रकाश पाटील (एस. जी. एम. कॉलेज, कराड), ५. ओंकार प्रकाश पाटील (जैवतंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ),

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान: १. शौनक आनंद बेले (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव), २. ऐश्वर्या दिलीप सास्ते (सायबर, कोल्हापूर), ३. काजल संजयकुमार अत्रि (सायबर, कोल्हापूर), ४. क्रांती अर्जुन देशमुख (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर) ५. प्रीती दगडू कोचाळे (किसन वीर महाविद्यालय,वाई)

वैद्यकीय आणि औषध निर्माण: १. सेजल शिदगोंडा खटकी (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव), २. प्रसाद दिलीप कोळी (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), ३. आकांक्षा रामचंद्र मोरे (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव),  ४. पूजा बाळू पुजारी (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), ५. मानसी मनोहर जाधव (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर).

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कैलास सोनवणे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले, केंद्रीय समन्वयक डॉ. डी.एच. दगडे, स्पर्धा समन्वयक डॉ. दत्तप्रसाद पोरे, डॉ. डी.एस. भांगे, डॉ. एस.एन. तायडे यांच्यासह रसायनशास्त्र अधिविभागातील सर्वच शिक्षक, प्रशासकीय सेवक यांनी परिश्रम घेतले.

Saturday, 21 December 2024

‘आविष्कार’मध्ये पदव्युत्तर संशोधकांकडून १९१ प्रकल्पांचे सादरीकरण

 

शिवाजी विद्यापीठात आविष्कार संशोधन स्पर्धेच्या ठिकाणी सादर केलेले प्रकल्प पाहण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची झालेली गर्दी.


कोल्हापूर, दि. २१ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या दोनदिवसीय विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये आज दुसऱ्या दिवशी पदव्युत्तर स्तरीय संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या संशोधन प्रकल्पांचे पोस्टर तसेच मॉडेल्सद्वारे सादरीकरण केले. आज एकूण १९१ संशोधकांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला. आजच्या महोत्सवामध्ये देखील संशोधकांमधील सामाजिक जाणिवांचे दर्शन त्यांनी संशोधनासाठी निवडलेल्या विषयांमधून घडत होते. दरम्यान, काल झालेल्या स्पर्धेचा निकालही सायंकाळी जाहीर करण्यात आला. त्यामधील अनुक्रमे पहिल्या तीन विजेत्या प्रकल्पांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे.

शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचे उद्दीष्ट बाळगून दरवर्षी आविष्कार संशोधन महोत्सव आयोजित करण्यात येतो. जिल्हास्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेच्या फेऱ्यांनंतर विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सव राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पार पडला. रसायनशास्त्र अधिविभागातर्फे महोत्सवाचे संयोजन करण्यात आले.

संशोधकांनी मानव्यशास्त्र, भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, शुद्ध विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय आणि औषधनिर्माण या सहा श्रेणींमध्ये प्रकल्प सादरीकरण केले. यामध्ये मानव्यशास्त्र गटात १७, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा गटात १९, शुद्ध विज्ञान गटात ५६, कृषी आणि पशुसंवर्धन गटात ३८, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान गटात १८ आणि वैद्यकीय व औषधनिर्माण गटात ४४ इतक्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यात विविध वनस्पतींच्या विविध घटकांपासून वेगवेगळ्या प्रकारची औषधे निर्माण करण्यापासून ते वेगवेगळी जैविक पद्धतीने नाश होणारी साधने व वस्तू यांची निर्मिती, जैविक खतनिर्मितीचे नवे पर्याय, उपयुक्त रंगनिर्मिती, सुपर कपॅसिटर निर्मिती, अन्नधान्य निरीक्षण पद्धती इत्यादींपासून ते युवकांमधील आत्महत्यांविषयी शोध, सायबर हल्ल्यांचा व्यापक दुष्परिणाम, भाषिक व्यवहार बदलांवरील समाजमाध्यमांचा प्रभाव अशा अनेक विषयांवरील प्रकल्प मांडण्यात आले. ही सादरीकरणे पाहण्यासाठी केवळ महाविद्यालयीनच नव्हे, तर शालेय विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली होती.

दरम्यान, महोत्सवात काल झालेल्या पदवीस्तरीय आणि पीएचडी संशोधन स्तरीय सादरीकरण स्पर्धेचा निकाल गटनिहाय अनुक्रमे पुढीलप्रमाणे:-

पदवीस्तरीय स्पर्धा: मानव्यशास्त्र, भाषा आणि कला:- १. भिसे प्रिती राजू (डी.के.ए.ए. महाविद्यालय, इचलकरंजी,) २. माने श्रुती सुरेश (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर), ३. पाटील अवंती अरविंद (जयसिंगपूर महाविद्यालय, जयसिंगपूर), ४. मुजावर सानिया जफर (विलिंग्डन महाविद्यालय, सांगली), ५. महाजन इंद्रायणी जालंदर (श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली).

वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा:- १. पिसाळ शर्वरी शैलेंद्र (केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, सातारा) २. गुरव शर्वरी भास्कर (न्यू कॉलेज, कोल्हापूर) ३. सूर्यवंशी सानिया धनाजी (यशवंतराव चव्हाण आर्ट्स कॉलेज, उरूण इस्लामपूर), ४. सावंत रामकृष्ण विवेक (तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, वारणानगर), ५. गायकवाड रसिका राजेंद्र (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर).

शुद्ध विज्ञान:- १. श्रीनिवास संचिता अजयकुमार (केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर), २. भुजबळ प्रतिक्षा हरीभाऊ (मुधोजी कॉलेज, फलटण), ३. बोरनाईक अनुराधा संजय (देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर),४. काळे नुपूर आनंदा (विलिंग्डन कॉलेज, सांगली), ५. शिंदे साक्षी सुनिल (दादासाहेब ज्योतीराम गोडसे महाविद्यालय, पलूस).

कृषी आणि पशुसंवर्धन:- १. पाटील विघ्नेश उत्तम (न्यू कॉलेज, कोल्हापूर), २. मुल्ला ताहीर निसार (यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, कराड) ३.कोंडुसकर रितिका रविंद्र (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर) ४. पानसरे जान्हवी यू. (राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, साखराळे),  ५. पाटील यश उमेश (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगांव)

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान:- १. घोईसावरवाडे दीक्षा निवास (न्यू कॉलेज, कोल्हापूर), २. लोकरे प्राची आनंदराव (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव), ३. पाटील श्रुती सुहास (कॉलेज ऑफ नॉन-कॉनव्हेशनल व्होकेशनल ऑफ कोर्स फॉर विमेन, कोल्हापूर), ४. पाटील निखिल निशिकांत (संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, चिंचेवाडी, गडहिंग्लज), ५. घाडगे पद्मावती प्रमोद (आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी, सांगली).                       

वैद्यकीय आणि औषधनिर्माण:- १. किल्लेदार श्रुती प्रशांत (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), २. सावंत वैष्णवी राजेंद्र (सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड), ३. पाटील ऋषीकेश सुनिल (अरविंद गवळी कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा), ४. माने स्वप्नील संपत (वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोडोली), ५. गडकरी अफताब मेहबूब (राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर).

पीएचडी संशोधनस्तरीय स्पर्धा: मानव्यशास्त्र, भाषा आणि कला:- १. कांबळे निलम बाळकृष्ण (डी.पी. भोसले कॉलेज, कोरेगाव), २. चौगुले किरण माणिकराव (यशवंतराव चव्हाण कॉलेज, उरूण इस्लामपूर), ३. बुद्धनवार सुनिल श्रीशैल्य (बळवंत कॉलेज, विटा).

शुद्ध विज्ञान:- १. चौगुले ऋतुजा दत्तात्रय (भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), २.  माळी किरण कुमार (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड), ३. इनामदार फरिदा रफिक (कस्तुरबाई वालचंद कॉलेज, सांगली), ४. देशमुख पूजा मोहन (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड), ५. भोसले अनिकेत दत्तात्रय (लालबहादूर शास्त्री कॉलेज, सातारा).

कृषी आणि पशुसंवर्धन:- १. खारिया रोहन रजनीकांत (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव), २. मुरगुडे मनिषा माणि (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव), ३. दहिवडे ललिता कमलाकर (भारती विदयापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर), ४. डोंगरे प्रतीक्षा माणिक (जीवरसायनशास्त्र अधिविभाग, शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर), ५. शिंदे सुनिता सखाराम (तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, वारणानगर).

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान:- १. चौगुले आण्णासाहेब महावीर (शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर), २. शीद शुभांगी (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव) ३. गिरीगोसावी शुभम तानाजी (भूगोल अधिविभाग, शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर), ४. शेळके अभिजित श्रीमंत (लालबहादूर शास्त्री कॉलेज, सातारा)

वैद्यकीय आणि औषधनिर्माण:- १. नेर्लेकर निशा अरुण (जैवरसायनशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), २. धरणगुत्तीकर व्यंकटेश रविंद्र (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव) ३. देसाई  नेहा दिपक ( अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी, पेठ वडगाव), ४. कचरे क्रांती शहाजी (रसायनशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), ५. डांगे विद्या नामदेव (राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव).