Saturday, 1 September 2018

प्रशासकीय कामाचा निपटारा सुलभतेने व जबाबदारपूर्वक होणे आवश्यक: डॉ. विलास नांदवडेकर


कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकरडॉ. एच.एम. ठकारडॉ. गणेश मांझाअजित चौगुले 

कोल्हापूर, दि. 1 सप्टेंबर: प्रशासनामधील प्रचलि कार्यप्रणालीच्या माध्यमातून कामाचा निपटारा सहज, सुलभतेने जबाबदारपूर्वक व्हावा, हा उद्देश जोपासून कर्मचाऱ्यांनी योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपाद शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या एम.बी.ए. अधिविभागातर्फे 'ॲकॅडमी ऑफ ॲकॅडेमि ॲडमिनिस्ट्रेटर्स' या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ॲकॅडमी ऑफ ॲकॅडमीक ॲडमिनीस्ट्रेशन, मुंबई अंतर्गत आयोजित या पहिल्या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीस्थानावरून कुलसचिव बोलत होते. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गणेश मांझा प्रमुख उपस्थित होते.
कुलसचिव डॉ.नांदवडेकर म्हणाले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय सेवक, अधिकारी यांना प्रशासकीय कामकाजाच्या अद्यावत द्धतीची माहिती करवून देण्यासाठी ही अकादमी स्थापन झालेली आहे. भविष्या राज्य राष्ट्रीय पातळीवरील सर्व स्तरावरील प्रशासकीय सेवक, अधिकाऱ्यांसाठी एक ते चार दिवसांच्या अशा द्धतीच्या मार्गदर्शनपर कार्यशाळांचे अयोजन करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. यामुळे वेगवेगळ्या आस्थापनावरील प्रशिक्षित सेवक, अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे सुलभ होईल.
ते पुढे म्हणाले, कार्यालयीन कामकाजामध्ये महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट, 2016 न्वये घ्यावयाच्या निर्णयाची सुरूवात धीक्षक पातळीपासून होते. त्यामुळे पूर्ण क्षमतेने व जबाबदारीने विविध विषयांवरील टिपणींचे सादरीकरण संबंधि विषयाच्या अनुषंगि संपूर्ण माहितीसह होणे आवश्यक आहे. अधिकार मंडळाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होण्यासाठी धीक्षकांनी सदैव दक्ष राहिले पाहिजे. कामकाजा गती येण्यासाठी कार्यालयामधील निरोगी वातावरणाची निर्मिती सुसंवादाने होईल. प्रत्येकास संगणकाचे अद्यावत ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यापीठाने कार्यान्वित केलेल्या मिटींग सॉफ्टवेअरची मागणी अनेक पातळीवरून होत आहे. कामकाजामध्ये विद्यार्थीकेंद्रि हिताची जपणूक प्राधान्याने केली पाहिजे.
एम.बी.ए. अधिविभागप्रमुख डॉ. एच.एम. ठकार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यापीठाचे अंतर्गत लेखापाल अजित चौगुले यांच्यासह विद्यापीठातील धीक्षक, सहाय्यक धीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 16 August 2018

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात



कोल्हापूर, दि. १६ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्य दिन काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. भारती पाटील, इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह शिक्षण, प्रशासकीय अधिकारी व सेवक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Friday, 10 August 2018

सैध्दांतिक भौतिक विज्ञानामधला हॉकिंग चमत्कार - डॉ.सुभाष देसाई


कोल्हापूर, 10 ऑगस्ट - सैध्दांतिक भौतिक विज्ञानामधला स्टिफन हॉकिंग चमत्कार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक डॉ.सुभाष देसाई यांनी केले.

            शिवाजी विद्यापीठाच्या ' रिसर्च कोलेक्युअम' मार्फत आयोजित जगद्विख्यात शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांच्या ' ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम' या पुस्तकाचे डॉ.सुभाष देसाई यांंनी मराठीमध्ये अनुवादीत केलेल्या 'कालाचा संक्षिप्त इतिहास' या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी डॉ.देसाई बोलत होते.  विद्यापीठाच्या रसायनशास्त्र सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे होते.

डॉ.सुभाष देसाई पुढे म्हणाले, ज्ञानाला एक नवीन दिशा देणारे पुस्तक आहे. अतिशय सुलभ सोपी मांडणी असून यामध्ये गणितीय मांडणी केलेली नाही. या पुस्तकामध्ये हॉकिंग यांनी निरनिराळया शास्त्रांचा अभ्यास करून मांडणी केलेली आहे.  समाज जीवनावर काळ या विषयाचे वेगवेगळे प्रभाव पडत असतात.  सर्व शास्त्रज्ञांनी नव विश्वाचे चित्र उभे केले यामध्ये स्टिफन हॉकिंग यांचा दर्जा फार मोठा आहे.  ही पृथ्वी ठिसूळ आहे त्यामुळे अणुस्फोट करणे थांबवा, मानवजात जीवंत ठेवायची असेल तर अंतराळामध्ये पृथ्वी सदृश्य ग्रह शोधा, असे हॉकिंग यांनी शास्त्रज्ञांना सांगितले होते. तत्वज्ञान विज्ञान या दोन्ही क्षेत्रांत मन ही संकल्पना खोलवर रूजलेली आहे.  मन हे आभासी तर मेंदू हे वास्तव हे द्वैत पाळणे लोकांना अवघड जाते.  मानसशास्त्र भक्कम वैज्ञानिक पाया अभावी अन्य विज्ञान शास्त्रांइतके वृध्दिंगत झाले नाही. जीवनाच्या विविध अंगावर मानसशास्त्राचा पडलेला प्रभाव नाकारता येत नाही.  विज्ञानाची कास धरल्याखेरीज रूढी परंपरांची जळमटे निघून जाणार नाहीत.  नवतंत्रज्ञानाच्या प्रवाहात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यामध्ये करिअर करावे. तंत्रज्ञानाचा वापर बहुजन हिताय, बहुजन सुखाय असावा.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, हॉकिंग यांचा ग्रंथ हा वैज्ञानिक खरा, पण तो केवळ विज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनीच वाचावा आणि इतरांनी वर्ज्य करावा, असा नाही.  जगातल्या प्रत्येक नागरिकाने हा ग्रंथ वाचला पाहिजे.  विज्ञानाचा ग्रंथ असला तरी त्याची भाषा, त्यामधील परिभाषा इतकी सुगम, सुबोध आहे की, कोणाही व्यक्तीला त्या सहजपणाने समजतील. मूळ ग्रंथातील ही सुगमता डॉ.देसार्‌इंनीही त्यांच्या ग्रंथामध्ये कौशल्याने उतरविली आहे.
डॉ.एस.डी.डेलेकर प्रास्ताविक केले. डॉ.पी.एम.माने यांनी परिचय करून दिला.  डॉ.पी.बी.माने यांनी आभार मानले.  यावेळी रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.जी.एस.गोसावी, डॉ.सी.ए.लंगरे यांचेसह विविध विभागातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----