Showing posts with label Alper-Dodger Scientific Index. Show all posts
Showing posts with label Alper-Dodger Scientific Index. Show all posts

Sunday, 3 September 2023

ए.डी. सायंटिफिक इंडेक्सच्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाचे ९६ संशोधक

 कुलगुरू, प्र-कुलगुरूंचा समावेश; प्र-कुलगुरूंचा एच इंडेक्स सर्वाधिक ८४

डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू

डॉ. प्रमोद पाटील, प्र-कुलगुरू


कोल्हापूर, दि. ३ सप्टेंबर: जागतिक पातळीवरील संशोधकांची क्रमवारी ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२३’ नुकतीच जाहीर करण्यात आली. या जागतिक संशोधकांच्या अद्यावत क्रमवारीत शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह एकूण ९६ वैज्ञानिक, संशोधकांचा समावेश झालेला आहे. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांचा एच इंडेक्स विद्यापीठात सर्वाधिक ८४ इतका आहे.

अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठामार्फत हा निर्देशांक सन २०२१ पासून दरवर्षी जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी या यादीमध्ये स्थान प्राप्त केले आहे. सन २०२१मध्ये ४८, सन २०२२ मध्ये ८०, मार्च २०२३मध्ये ९२ आणि आता ९६ अशा चढत्या क्रमाने विद्यापीठातील संशोधकांची या यादीमधील संख्या वाढत राहिली आहे.

अमेरिकेच्या मिशीगन विद्यापीठातील प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे ‘आल्पर-डॉजर सायंटिफीक इंडेक्स’ तथा ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’ विश्लेषित केलेला आहे. त्यासाठी त्यांनी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा गेल्या पाच वर्षांतील एच-इंडेक्स, आय-टेन इंडेक्स हे निर्देशांक तसेच सायटेशन स्कोअर (उद्धरणे) इत्यादी बाबींचे पृथक्करण केले. एकूण ५५ देश, १०,८८६ विद्यापीठे आणि ४ लाख ४ हजार २२८ शास्त्रज्ञांच्या संशोधकीय कामगिरीचे विश्लेषण करून एच इंडेक्स, आय १० इंडेक्स आणि सायटेशन इत्यादी शास्त्रीय निकषांवर व्यक्ती आणि संस्थांची उत्पादकता आणि कार्यक्षमता यांचे मूल्यांकन केले जाते.

या रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठातील एकूण ९६ संशोधक-प्राध्यापकांचा समावेश झाला आहे. गुगल स्कॉलर सायटेन्शनच्या आधारे काढण्यात आलेल्या निर्देशांक यादीत गेल्या वर्षीच्या संशोधकांनी आपले स्थान कायम राखले आहे. या यादीत प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांचा सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. क्रमवारीत रसायनशास्त्र १३, पदार्थ विज्ञान १०,  जैवरसायनशास्त्र ५, इलेक्ट्रॉनिक्स ३, पर्यावरण शास्त्र ३, फूड सायन्स २, वनस्पती शास्त्र ३, प्राणीशास्त्र ९,संख्याशास्त्र १, गणित १, नॅनो  व तंत्रज्ञान ३, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान ७, मानव्यशास्त्र आणि भाषा विभाग ६.

अत्यंत व्यापक स्तरावर घेण्यात आलेल्या या क्रमवारीमध्ये ‘अ++’ मानांकित शिवाजी विद्यापीठाच्या ९६ संशोधकांचा समावेश होणे ही महत्त्वाची बाब आहे. या संशोधकांत स्थान प्राप्त करणारे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक आहेत. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी मटेरियल सायन्स, सौरघट, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, गॅस सेन्सर आणि नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान कायम राखले आहे.

या संदर्भात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’मध्ये संशोधकांची संख्या वर्षागणिक वाढते आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील संशोधकांचे हे कार्य अभिनंदनीय आहे. शिवाजी विद्यापीठात विविध विषयांत सुरू असणाऱ्या अखंडित संशोधनामुळेच या यादीतील संशोधकांची संख्या वाढते आहे. यापुढील काळातही विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील संशोधकांनी आपले संशोधनकार्य जोमाने करीत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

ए.डी. सायंटिफिक इंडेक्समध्ये स्थान प्राप्त करणाऱ्या संशोधकांची नावे पुढीलप्रमाणे: पदार्थविज्ञान शास्त्र- डॉ. प्रमोद पाटील, डॉ. केशव राजपुरे, डॉ. सी. एच. भोसले, डॉ. ए. व्ही. मोहोळकर, डॉ. आर. जी. सोनकवडे,  डॉ.व्ही. आर. पुरी, डॉ.एम. व्ही. टाकळे, डॉ. टी. जे. शिंदे, डॉ.एस. बी. सादळे, डॉ.ए. बी. गडकरी, डॉ. एस. एस. पाटील.

रसायनशास्त्र- डॉ. के. एम. गरडकर, डॉ. एस. एस. कोळेकर, डॉ. ए. व्ही. घुले, डॉ. एस. डी. डेलेकर, डॉ.जी.बी. कोळेकर, डॉ. डी.एम.पोरे, डॉ. आर. एस. साळुंखे, डॉ. एम. बी. देशमुख, डॉ. जी. एस. राशिनकर, डॉ. डी. एच. दगडे, डॉ. एस. एम. पाटील, डॉ. व्ही. व्ही. गावडे.

जैवरसायनशास्त्र- डॉ. एस. पी. गोविंदवार, डॉ. जे. पी. जाधव, डॉ. के. डी. सोनवणे, डॉ. पी. बी. दंडगे, डॉ. पी. के. पवार.

इलेक्ट्रॉनिक्स- डॉ. टी. जी. डोंगळे, डॉ. एस. आर. सावंत, डॉ. पी. एन. वासंबेकर, डॉ. आर. आर. मुधोळकर.

वनस्पतीशास्त्र- डॉ.एन. बी. गायकवाड, डॉ. डी. के.  गायकवाड, डॉ. एस. जी. घाणे, डॉ. आर. व्ही. गुरव.

प्राणीशास्त्र- डॉ. एम. व्ही. शांताकुमार, डॉ. टी.व्ही. साठे,  डॉ. के. मोरे, डॉ. एम. बी. भिलावे, डॉ. एस. एम. गायकवाड, डॉ. एन. ए. कांबळे, डॉ. एम. व्ही. वाळवेकर, डॉ. ए. ए. देशमुख.

पर्यावरणशास्त्र- डॉ. पी. डी. राऊत, डॉ. विजय कोरे, डॉ. सोनल चोंदे.

अन्न विज्ञान व अभियांत्रिकी- डॉ. ए.के. साहू, डॉ. आर.सी. रणवीर.

संख्याशास्त्र- डॉ. डी. टी. शिर्के.

गणित शास्त्र- डॉ. के. डी. कुच्चे.

नॅनोसायन्स व तंत्रज्ञान- डॉ. के.के. शर्मा, डॉ. पी. जे. कसबे, डॉ. मेघा देसाई.

फार्मसी- डॉ. जॉन डिसूझा, डॉ.ए.एस. पायघन.

मानव्यविद्या आणि भाषा विभाग – डॉ. एम. एस. देशमुख, डॉ. मेघा नानिवडेकर, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. के. व्ही. मारुलकर.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान- डॉ. व्ही. ए. सावंत, डॉ. एस. आर. यंकंच्ची, डॉ. यू.आय. बोंगळे, डॉ.आय.एस. उडचण, डॉ.एच पंडित.

भूगोल- डॉ. यश शिंदे, डॉ. सचिन पन्हाळकर.

संगणक शास्त्र - डॉ. के. खराडे, डॉ. के. एस. ओझा.

Saturday, 19 March 2022

‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’च्या ताज्या क्रमवारीत

शिवाजी विद्यापीठाच्या ४८ संशोधकांचे स्थान कायम

 

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील 


विद्यापीठास एच इंडेक्समध्ये देशात ६३वे स्थान; प्र-कुलगुरू पाटील यांचा एच-इंडेक्स ७६

 

कोल्हापूर, दि. १९ मार्च: .डी. सायंटिफिक इंडेक्सतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२२मध्ये शिवाजी विद्यापीठातील एकूण ४८ संशोधक-प्राध्यापकांचा समावेश झालेला आहे. गुगल स्कॉलर सायटेशन्सच्या आधारे काढण्यात आलेल्या या निर्देशांक यादीमध्ये मागील वर्षी असलेल्या संशोधकांनी त्यांचे स्थान कायम राखले आहे. नॅक अ++ मानांकित शिवाजी विद्यापीठासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. शिवाजी विद्यापीठास देशातील २१४५ संस्थांमध्ये एच इंडेक्सच्या आधारावर देशात ६३ वे स्थान प्राप्त झाले आहे. या यादीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचा एच-इंडेक्स हा सर्वाधिक म्हणजे ७६ इतका आहे. भारतातील मोजक्याच संशोधकांचा इतका मोठा एच इंडेक्स आहे.

एडी सायंटिफिक इंडेक्स (अल्पर-डोजर सायंटिफिक इंडेक्स), जर्नल्स आणि विद्यापीठांचे मूल्यमापन करणार्‍या इतर प्रणालींपेक्षा वेगळी आहे. यात शास्त्रज्ञांच्या संशोधनातील कामगिरी आणि वैयक्तिक वैज्ञानिक उत्पादकतेच्या अतिरिक्त मूल्यावर आधारित क्रमवारी आणि विश्लेषण करण्यात आले आहे. शिवाय शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक वैशिष्ट्यांवर आधारित संस्थांची क्रमवारी काढली जाते. एच-इंडेक्सच्या आधारे शिवाजी विद्यापीठाने भारतातील २१४५ संस्थांमध्ये ६३ वे स्थान मिळवले आहे. शिवाजी विद्यापीठ मटेरियल सायन्स संशोधनात सर्वोत्तम संस्थांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तथापि, सदरची क्रमवारी सर्व विज्ञान विषयांतील संशोधनावर आधारित आहे.

या संशोधकांत स्थान प्राप्त करणारे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के हे संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक असून प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांना भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान प्राप्त झाले आहे. सदर यादीत जगातल्या २१६ देशांतील १४,९८१ विद्यापीठांतील ८,२५,७१० संशोधकांच्या डेटाचे पृथक्करण केले आहे. या क्रमवारीत रसायनशास्त्राचे १३, पदार्थविज्ञान ११, जैवरसायनशास्त्र ६, इलेक्ट्रॉनिक्स ४, पर्यावरणशास्त्र ३, फूड सायन्स २, फार्मसी २, वनस्पतीशास्त्र २,  प्राणीशास्त्र २, नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान १, गणित १ असे एकूण ४८ आजी-माजी संशोधक समाविष्ट आहेत. या यादीत ९ निवृत्त प्राध्यापकांचाही समावेश आहे. संलग्नित महाविद्यालयांतील सात संशोधकांचाही या यादीत समावेश आहे.

एच-इंडेक्स म्हणजे काय?

एच-इंडेक्स हा संशोधन लेखक-स्तरीय निर्देशांक आहे, जो प्रकाशनांची उपयुक्तता, उपयोजन आणि उद्धरण प्रभाव या बाबींचे मापन करतो. वैयक्तिक शास्त्रज्ञ आणि विद्वानांच्या संशोधन लेखनासाठी तो वापरला जातो. संशोधनासाठीची पारितोषिक जिंकणे, संशोधन फेलोशिपसाठी स्वीकारले जाणे आणि  विद्यापीठांमध्ये उच्च पदे धारण करणे यासारख्या स्पष्ट यश दर्शविणाऱ्या बाबींशी एच-इंडेक्स निगडित असतो. हा निर्देशांक शास्त्रज्ञांच्या सर्वाधिक उद्धृत केलेल्या कागदपत्रांच्या संचावर आणि त्यांना इतर प्रकाशनांमध्ये मिळालेल्या उद्धरणांच्या संख्येवर आधारित आहे. हा निर्देशांक नुकताच महत्त्वाची जर्नल, विभाग, विद्यापीठे अगर देश यासारख्या शास्त्रज्ञांच्या गटाच्या उत्पादकता आणि प्रभावावरही लागू केला गेला आहे. सन २००५ मध्ये यूसी सॅन दिएगो येथील भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ई. हिर्श यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञांची सापेक्ष गुणवत्ता निश्चित करण्यासाठी एक साधन म्हणून निर्देशांक सुचवला होता. तोच हिर्श इंडेक्स किंवा एच-इंडेक्स म्हणून ओळखला जातो.

ए.डी. सायंटिफिक इंडेक्स २०२२ च्या यादीत स्थान लाभलेले शिवाजी विद्यापीठातील संशोधक पुढीलप्रमाणे असून त्यांचा एच-निर्देशांक कंसात दिलेला आहे.-

भौतिकशास्त्र-

१. डॉ. पी.एस. पाटील (७६)

२. डॉ. के.वाय. राजपुरे (५७)

३. डॉ. सी.एच. भोसले (५४)

४. डॉ. ए.व्ही. मोहोळकर (५२)

५. डॉ. एन.एल. तरवा (२८)

६. डॉ. आर.जी. सोनकवडे (२६)

७. डॉ. व्ही.आर. पुरी (२५)

८. डॉ. एस.बी. साळे (१९) 

९. डॉ. एम.व्ही. टाकळे (१८)

१०. डॉ. टी.जे. शिंदे, इस्लामपूर (१८)

११. डॉ. ए.बी. गडकरी, गोखले महाविद्यालय, कोल्हापूर (१६)

रसायनशास्त्र-

१.  डॉ. के.एम. गरडकर (४०)

२. डॉ. एस.एस. कोळेकर (३४)

३. डॉ. ए.व्ही. घुले (३१)

४. डॉ. एस.डी. डेळेकर (३१)

५. डॉ. जी.बी. कोळेकर (२७)

६. डॉ. डी.एम. पोरे (२४)

७. डॉ. आर.एस. साळुंखे (२२)

८. डॉ. एम.बी. देशमुख (२०)

९. डॉ. जी. एस. राशीनकर (१९)

१०. डॉ. डी.एच. दगडे (१८)

११. डॉ. ए. दोड्डमणी, शाहू महाविद्यालय, कोल्हापूर (११)

१२. डॉ. एस.एम. पाटील, गारगोटी (१०)

१३. डॉ. एन.आर. प्रसाद, जयसिंगपूर (१०)

जैवरसायनशास्त्र-

१. डॉ. एस.पी. गोविंदवार (६७)

२. डॉ. जे.पी. जाधव (४५)

३. डॉ. के.डी. सोनावणे (१९)

४. डॉ. पी. बी. दंडगे (१३)

५. डॉ. पी.के. पवार (१३)

६. डॉ. नीरज राणे, पुणे (१२)

इलेक्ट्रॉनिक्स -

१. डॉ. एस.आर. सावंत (२७)

२. डॉ. टी.डी. डोंगळे (२५)

३. डॉ. पी.एन. वासंबेकर (२३)

४. डॉ. आर.आर. मुधोळकर (१३)

वनस्पतीशास्त्र-

१. डॉ. एन.बी. गायकवाड (१५)

२. डॉ. डी.के. गायकवाड (१३)

प्राणीशास्त्र-

१. (स्व.) डॉ. एम.व्ही. शांताकुमार (१६)

२. डॉ. टी.व्ही. साठे (११)

पर्यावरणशास्त्र-

१. डॉ. पी.डी. राऊत (१६)

२. डॉ. व्ही. कोरे (१०)

३. डॉ. एस. चोंदे (१०)

अन्नविज्ञान व अभियांत्रिकी-

१. डॉ. ए.के. साहू (१५)

२. डॉ. आर. रणवीर (१४)

फार्मसी-

१. डॉ. जे. डिसुझा, वारणानगर (१९)

२. डॉ. एस. पायघन (१७)

संख्याशास्त्र-

१. डॉ. डी.टी. शिर्के (१६)

गणितशास्त्र-

१. डॉ. के.डी. कुचे (१४)

नॅनोसायन्स व तंत्रज्ञान-

१.      डॉ. किरण कुमार शर्मा (१४)