Friday, 22 April 2022

शिवाजी विद्यापीठाचा ‘आयसीटी’समवेत सामंजस्य करार

 

ICT, Mumbai


 

कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी, मुंबई) यांचा येथील शिवाजी विद्यापीठासमवेत झालेल्या सामंजस्य कराराचा लाभ या दोन्ही शैक्षणिक व संशोधकीय संस्थांमधील प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर घटकांनाही होईल, अशी अपेक्षा आयसीटीचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या विविध विज्ञान विभागांत, सैफ-सीएफसी (SAIF-CFC) येथे आणि आयसीटीच्या विविध कॅम्पसमध्ये उपलब्ध असणारी अत्याधुनिक उपकरणे वापरण्यासाठीचे कौशल्यही त्यांना परस्परपूरक स्वरुपाचे ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठ आणि आयसीटी, मुंबई यांच्या दरम्यान १२ एप्रिल २०२२ रोजी पाच वर्षांच्या कालावधीसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि आयसीटीच्या संशोधन व नवोन्मेष विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. पद्मा व्ही. देवराजन यांनी स्वाक्षरी केल्या.

संयुक्त संशोधनपर व शैक्षणिक उपक्रम या संदर्भातील देवाणघेवाण हा या सामंजस्य कराराचा प्रमुख हेतू आहे. यातून नवीन तंत्रज्ञानवर्धित संशोधन अपेक्षित आहे. या करारामध्ये गरजेनुसार अन्य विज्ञान अधिविभागांना सामावून घेण्याचीही अगर स्वतंत्र करार करण्याचीही तरतूद आहे.

आता या सामंजस्य करारामुळे, दोन्ही विद्यापीठांनी विविध संशोधन उपक्रम सुरू केले आहेत त्याचे प्रस्ताव निधी संस्थांकडे सादर केले जातील. दोन्ही संस्थांमधील या समान स्वारस्य असणाऱ्यांना या सामंजस्य करारामुळे संयुक्त संशोधन आणि प्रकाशनाला आणखी गती मिळेल.

कराराच्या अनुषंगाने माहिती देताना पदार्थविज्ञान अधिविभागाचे डॉ. आर.जी. सोनकवडे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आयसीटीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सहकार्याने कौशल्य विकास करवून ज्ञान वाढवण्यासाठी हा करार नक्कीच उपयुक्त ठरेल. संयुक्त संशोधन आणि प्रकाशनांच्या शक्यता विकसित करण्यासाठी संयुक्त चर्चासत्रे, परिषदा आणि कार्यशाळा आयोजित करून प्रशासन आणि व्यवस्थापनाशी संबंधित अनुभव आणि कौशल्याची देवाणघेवाण केली जाणेही याअंतर्गत अभिप्रेत आहे.

या कराराच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आयसीटी ही राज्यातील एक महत्त्वपूर्ण संशोधन संस्था असून त्यांच्यासमवेतच्या करारामुळे संयुक्त संशोधन उपक्रमांना चालना मिळेल. विशेषतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अशा विविध प्रमुख विज्ञान विभागांमधील संशोधनाला गती मिळेल. तसेच, शिवाजी विद्यापीठात उपलब्ध संशोधन सामग्रीचा आयसीटीच्या संशोधक, विद्यार्थ्यांनाही लाभ मिळेल.

Monday, 18 April 2022

डॉ. ए.एम. गुरव यांच्या 'व्यवस्थापन शास्त्राचे मानकरी'चे प्रकाशन

डॉ. ए.एम. गुरव व डॉ. आर.एस. साळुंखे यांच्या 'व्यवस्थापन शास्त्राचे मानकरी' या पुस्तकाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. व्ही.एन. शिंदे, जी.आर. पळसे, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. गुरव, डॉ. साळुंखे आदी.

 

कोल्हापूर, दि.१८ एप्रिल: विद्यार्थी, अभियंता, उद्योजक, धोरणकर्ते यांच्यासाठी 'व्यवस्थापन शास्त्राचे मानकरी' हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. विद्यार्थ्यांना बोलते करणारे पुस्तक आहे, असे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी शनिवारी येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागातील डॉ. ए.एम. गुरव डॉ. आर.एस. साळुंखे लिखित 'व्यवस्थापन शास्त्राचे मानकरी' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभा अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ.शिर्के म्हणाले, पदवी, दव्युत्तर पदवी, संशोधक, व्यवस्थाप, सांख्यिकी, आंतरविद्याशाखीय विद्यार्थी यांच्यासह सर्वच घटकातील अभ्यासकांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. जीवना व्यवस्थापन शास्त्रास खू महत्त्व आहे. त्यामुळे या विषयावरील पुस्तक मराठी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठाच्या हिरकमहोत्वी वर्षा विद्यापीठ महाविद्यालयांतील शिक्षकांकडून जास्तीत जास्त चांगली पुस्तके प्रकाशित व्हायला हवीत. डॉ.गुरव यांचे हे ३३ वे पुस्तक आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. या पुस्तकात त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील २१ व्यवस्थापन गुरूंचे कार्य संकलित केले आहे. शिक्षकांना त्या आधारे विद्यार्थ्यांकडून २१ सेमिनार करवून घेता येतील.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, या पुस्तका राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापन शास्त्रज्ञांची केलेली अभ्यासपूर्ण मांडणी, त्यांचे विचार, मानसिक क्रांती, समस्या शास्त्रीय द्धतीने सोडविण्याची हातोटी, कामामध्ये हार मानण्याची वृत्ती आदी बाबींच्या शिकवणीमुळे विद्यार्थ्यांना लाभदायक ठरेल.

यावेळी डॉ. ए.एम. गुरव यांनी स्वागत प्रास्ताविक केले. पुस्तकाचे सहलेखक डॉ. आर.एस. साळुंखे यांनी पुस्तक परिचय करून दिला. डॉ. के.व्ही. मारूलकर यांनी आभार मानले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, वाणिज्य व्यवस्थापन अधिविभागप्रमुख डॉ. एस.एस. महाजन, माजी अधिविभागप्रमुख डॉ. व्ही.एस. पाटील, डॉ. बी.के. काटकर, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.