कोल्हापूर, दि. २३
मार्च: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिवाजी
विद्यापीठाने विद्यार्थी, शिक्षक यांना ३१ मार्चपर्यंत वर्गामध्ये एकत्र येऊन अध्यापन
प्रक्रिया थांबविण्याची सूचना केली आहे. तथापि, विद्यापीठाच्या ऑनलाईन
सेवा-सुविधांमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अध्ययन प्रक्रिया सुरू ठेवणे शक्य झाले
आहे.
शिवाजी विद्यापीठाने
गेल्या काही वर्षांत ऑनलाईन अभ्यासक्रम निर्मितीसह MOOC, MOODLE आदी ऑनलाईन उपलब्ध व्यासपीठांचा ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी
मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरवात केली. वर्गामधील नियमित अध्यापनाला ऑनलाईन
अध्ययनाची जोड लाभल्याने विद्यार्थ्यांना विषय समजावून घेणे आणि त्याचा
सुनियोजितरित्या अभ्यास करणे शक्य झाले आहे. सद्यस्थितीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव
टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणांसह गर्दीची ठिकाणे टाळणे हा एक
महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने शासन आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत
वर्गातील अध्यापन बंद केले आहे. अशा वेळी ऑनलाइन व्यासपीठांवरील अध्यापन आणि
अध्ययन प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सज्ज असल्याचे दिसून आले आहे. अनेक
विद्यार्थी या सुविधांचा लाभ घेऊन आपल्या अभ्यासात खंड न पडू देण्याची दक्षता घेत
आहेत.
MOOC, MOODLE चा वापर करण्याचे कुलगुरूंचे
आवाहन
या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
देवानंद शिंदे यांनी असे म्हटले आहे की, शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षकांना
सध्याच्या ‘वर्क फ्रॉम
होम’चे आवाहन करीत असताना विद्यापीठ
प्रशासनाने मूक (मासिव्ह ऑनलाइन ओपन कोर्स) आणि मूडल (मॉड्युलर ऑब्जेक्ट ओरिएंटेड
डायनॅमिक लर्निंग एन्व्हायर्नमेंट) या दोन ई-लर्निंग व्यासपीठांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना
त्यांच्या आवश्यकतेनुसार ऑनलाइन मार्गदर्शन करावे, त्यासाठी आवश्यक ते
प्रेझेंटेशन, नोट्स वगैरे सामग्रीची निर्मिती करावी, असे आवाहन केले आहे. सध्याच्या
आपत्कालीन परिस्थितीत थेट अध्यापन करता येत नसले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक
नुकसान होऊ नये, याची खबरदारी म्हणून ऑनलाइन व्यासपीठांचा मुबलक वापर करावा, अशा
सूचना शिक्षकांना देण्यात आल्या. त्यानुसार, बहुतेक शिक्षकांनी मूक, मुडलच्या
आधारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापनास प्रारंभही केला, ही समाधानाची बाब आहे.
तथापि, अद्यापही जे विद्यार्थी ऑनलाइन व्यासपीठांचा वापर करीत नसतील, त्यांनी
सुद्धा मूक, मुडल या व्यासपीठांचा पुरेपूर वापर करून आपले शैक्षणिक नुकसान होणार
नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले आहे.
या
संदर्भ
साहित्याबरोबरच
केंद्रीय मनुष्यबळ
विकास
मंत्रालयाचा
महत्त्वपूर्ण
उपक्रम
असलेल्या
‘स्वयम’ (SWAYAM) या
उपक्रमाच्या
लिंकही
विद्यापीठाच्या
वेबसाईटवर
विद्यार्थ्यांना
उपलब्ध
करून
देण्यात
आल्या
आहेत,
जेणे
करून
त्यांना
अभ्यासाचे
लिखित
तसेच
ऑडिओ-व्हिज्युअल्सही
उपलब्ध
व्हावेत. स्वयम उपक्रमाच्या
https://swayam.gov.in/ या मुख्य लिंकसह ‘स्वयंप्रभा’ https://www.swayamprabha.gov.in/ या ३२ डीटीएच वाहिन्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्याखेरीज इन्फ्लिबनेटचे
‘मूक’ (http://ugcmoocs.inflibnet.ac.in/) आणि ई-पीजी पाठशाला
(http://epgp.inflibnet.ac.in/) हे अभ्यासविषयक साहित्यही एक्सेस करण्याची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. त्यांचा लाभ घेण्याचे आवाहनही कुलगुरूंनी केले आहे.
(http://epgp.inflibnet.ac.in/) हे अभ्यासविषयक साहित्यही एक्सेस करण्याची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. त्यांचा लाभ घेण्याचे आवाहनही कुलगुरूंनी केले आहे.
या प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या
बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राने अन्य ऑनलाइन संदर्भ साहित्यही उपलब्ध
केले आहे. या केंद्राच्या http://www.unishivaji.ac.in/library/ या संकेतस्थळाच्या माध्यमातून विद्यार्थी-शिक्षकांसाठी अनेक
अध्ययन-अध्यापनविषयक ऑनलाइन सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ज्ञानस्रोत
केंद्राने ई-बुक्स, ई-डाटाबेस आणि ई-जर्नल्स आदींचे अनेक ऑनलाईन स्रोत विद्यापीठाच्या
वेबसाईटवर उपलब्ध केले आहेत. http://www.unishivaji.ac.in/library/E-Books
या लिंकद्वारे सायन्स
डायरेक्ट, स्प्रिंजर, केंब्रिज आदी नामांकित प्रकाशकांचे ५७८ ई-बुक्स पूर्ण
टेक्स्ट स्वरुपात वाचता येतात. http://www.unishivaji.ac.in/library/E-Journals या लिंकद्वारे विविध नामांकित
प्रकाशकांचे ४४ ई-जर्नल्स अभ्यासता येतात. त्याचप्रमाणे http://www.unishivaji.ac.in/library/E-Databases या लिंकवर संशोधनासाठी
अत्यावश्यक अशा सायफाइंडर, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, स्कोपस, जे-गेट ससोशल सायन्सेस
अँड ह्युमॅनिटीज, जे-गेट सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, इबिस्को डिस्कव्हरी सर्व्हिस आदी
१८ ई-डाटाबेसचा अभ्यास करता येतो. याशिवाय INFED (इन्फ्लिबनेट एक्सेस मॅनेजमेंट फेडरेशन) अंतर्गत सहा
नामांकित प्रकाशकांचे डाटाबेस विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. दिव्यांग
विद्यार्थ्यांना सुद्धा ज्ञानस्रोत केंद्राने http://www.unishivaji.ac.in/library/Resource-Centre-for-Inclusive-Education-(RCIE) या लिंकद्वारे दूरशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे.
No comments:
Post a Comment