Friday 30 June 2023

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या १६८ अभ्यासक्रमांचे निकाल विहीत मुदतीत

 परीक्षा संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांची माहिती

कोल्हापूर, दि. ३० जून: शिवाजी विद्यापीठाच्या मार्च/एप्रिल-२०२३ उन्हाळी सत्रातील पदवी  व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या १६८ अभ्यासक्रमांचे निकाल विहीत मुदतीमध्ये लावण्यात परीक्षा व मूल्यमापन मंडळाला यश आले आहे, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली आहे.

डॉ. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या मार्च/एप्रिल-२०२३ उन्हाळी सत्रातील पदवी  व पदव्युत्तर अशा एकूण ६०० परीक्षांचे आयोजन मे-२०२३ ते ऑक्टोबर-२०२३ या कालावधीत करण्यात आलेले आहे. सदरच्या परीक्षांना २५ मेपासून व्यवस्थितपणे प्रारंभ झालेला आहे. एकीकडे परीक्षा सुरू असतानाच त्या पूर्ण होतील, त्यानुसार त्यांचे मूल्यमापनविषयक कामकाजही गतीने पूर्ण करण्यात आले. विशेषतः बी.ए., बी.एस्सी. आणि बी.बी.ए. आदी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या १६८ अभ्यासक्रमांचे निकाल आजअखेर घोषित करण्यात आले आहेत. दोन दिवसांपासून ते २८ दिवस इतक्या अल्प कालावधीत हे निकाल घोषित करण्यात यश आले आहे.

शिवाजी विद्यापीठाचा विहीत मुदतीत निकाल घोषित करण्याच्या बाबतीत राज्यभरात लौकिक आहे. या बाबीचे मा. राज्यपाल तथा कुलपती यांच्याकडूनही वेळोवेळी कौतुक झाले आहे. सध्याच्या मा. कुलपती महोदयांनी राज्यातील कुलगुरूंसमवेत झालेल्या चर्चेमध्ये परीक्षांचे निकाल विहीत मुदतीत घोषित करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे आणि त्यानंतरचे मूल्यमापनविषयक कामकाज यांचे काटेकोर नियोजन करण्यात आले. महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, मूल्यमापन केंद्रांचे अधिकारी तथा प्रशासकीय कर्मचारी आदी घटकांनी त्या दृष्टीने काम केले आणि विद्यापीठाचे निकाल विहीत मुदतीत लावण्याच्या कामी सहकार्य केले. बी.कॉम. व विधी परीक्षेचे निकाल पुढील दोन दिवसात घोषित करण्यात येणार आहेत. द्वितिय व तृतीय वर्षाची एकत्रित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचेही निकाल दोन दिवसांत लावण्यात येतील. उर्वरित परीक्षांचे निकाल सुद्धा विहीत मुदतीमध्येच लागतील, या दृष्टीने परीक्षा विभागाने नियोजन केले आहे आणि त्यानुसार काम करण्यात येत आहे, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली बेरोजगारी आणि सध्या विविध विभागामार्फत सुरु असलेली भरती प्रक्रिया लक्षात घेता विविध अभ्यासक्रमांचे अंतिम वर्षाचे निकाल लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवसाय व नोकरीसाठी अंतिम पदवीचे गुणपत्रक आवश्यक आहे, याची शिवाजी विद्यापीठाला जाणीव आहे. त्या दृष्टीने झालेल्या परीक्षांचे निकाल विद्यापीठाने खालील तपशिलाप्रमाणे जाहीर केलेले आहेत.

  

अ.क्र.

अभ्यासक्रमाचे नाव

परीक्षा समाप्तीचा दिनांक

निकाल जाहीर दिनांक

निकाल जाहीर होण्यास लागलेला

कालावधी

बी.एस्सी.

६-०६-२०२३

२४-०६-२०२३

१८

बी.ए.

३१-०५-२३

२८-६-२०२३

२८

बी.बी.ए.

१२-०६-२३

२८-६-२०२३

१५

बी.व्होक. (फलोत्पादन विज्ञान व तंत्रज्ञान)

०६-०६-२३

१६-०६-२३

१०

बी.व्होक. (पर्यटन व सेवा उद्योग)

०६-०६-२३

१४-०६-२३

०८

बी.व्होक. (शाश्वत कृषी व्यवस्थापन)

०६-०६-२३

१४-०६-२३

०८

बी.एस्सी. (जैवतंत्रज्ञान)

०६-०६-२३

१४-०६-२३

०८

बी.ए. (संरक्षण अभ्यास)

०६-०६-२३

१५-०६-२३

०९

बी.एस्सी. (पर्यावरण)

०६-०६-२३

१५-०६-२३

०९

१०

बी.व्होक. (अन्नप्रक्रिया व्यवस्थापन)

०६-०६-२३

१५-०६-२३

०९

११

बी.एस्सी.-एम.एस्सी. (नॅनोविज्ञान)

१०-०६-२३

१६-०६-२३

०६

१२

बी.एस्सी. (शर्करा तंत्रज्ञान)

१०-०६-२३

१७-०६-२३

०७

१३

बी.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान)

०७-०६-२३

१७-०६-२३

१०

१४

बी.एस्सी. (अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान)

०६-०६-२३

१७-०६-२३

११

१५

बी.एस.डब्ल्यू.

१२-०६-२३

१७-०६-२३

०५

१६

बी.ए.- बी.एड.

३१-०५-२३

१७-०६-२३

१७

१७

बी.एस्सी. (अन्नविज्ञान व तंत्रज्ञान)

१२-०६-२३

१८-०६-२३

०६

१८

बी.व्होक. (ऑटोमोबाईल)

०६-०६-२३

१८-०६-२३

१२

१९

बी.व्होक. (रिटेल मॅनेजमेंट)

०६-०६-२३

१९-०६-२३

१३

२०

बी.कॉम. (बँकिंग व्यवस्थापन)

३१-०५-२३

१९-०६-२३

१९

२१

बी.व्होक. (प्रिंट अँड पब्लिकेशन)

०५-०६-२३

१९-०६-२३

१४

२२

बी.व्होक (नर्सिंग)

०६-०६-२३

१९-०६-२३

१३

२३

बी.डीईएस.

२९-०५-२३

१९-०६-२३

२१

२४

बी.व्होक. (शाश्वत कृषी)

०६-०६-२३

२०-०६-२३

१४

२५

बी.आय.डी.

३१-०५-२३

२१-०६-२३

२१

२६

बी.लिब.

१४-०६-२३

२१-०६-२३

०७

२७

बी.कॉम. (माहिती तंत्रज्ञान)

१४-०६-२३

२२-०६-२३

०८

२८

बी.एफ.टी.एम.

०६-०६-२३

२२-०६-२३

१६

२९

बी.सी.एस.

०६-०६-२३

२३-०६-२३

१७

३०

बी.सी.ए.

२७-०६-२३

२९-०६-२३

०२

३१

बी.आर्क.

२८-०६-२३

३०-०६-२३

०२

 

 परीक्षाविषयक कामकाज पाहणारे सर्वच घटक अभिनंदनास पात्र: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांचे अंतिम वर्षाचे बहुतांशी निकाल सर्व यंत्रणेने युद्धपातळीवर कामकाज करून अल्प कालावधीमध्ये घोषित केलेले आहेत. विहीत मुदतीमध्ये निकाल जाहीर करण्याची शिवाजी विद्यापीठाची परंपरा यंदाही जपली गेली आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयार केलेल्या मूल्यमापन नियोजन तक्त्यानुसार सर्व अधिविभागप्रमुख, तेथील शिक्षक, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, परीक्षक, मूल्यमापन केंद्रांवर नियुक्त अधिकारी, कर्मचारी आदी सर्वच घटकांनी बहुमूल्य स्वरुपाचे योगदान दिले. हे सर्वच घटक अभिनंदनास पात्र आहेत. यापुढेही त्यांनी अशाच पद्धतीची कामगिरी करीत विद्यापीठाचा लौकिक उंचावत ठेवावा, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली आहे.