शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ परिसरात शिवज्योत रॅली काढण्यात आली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. |
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ परिसरात काढण्यात आलेल्या शिवज्योत रॅलीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी. |
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत उपस्थित अधिकारी. |
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत उपस्थित अधिकारी. |
कोल्हापूर, दि. ६
जून: शिवाजी विद्यापीठात आज
शिव-राज्याभिषेक दिन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात
साजरा करण्यात आला.
सनईच्या सुरांमुळे आज सकाळपासूनच विद्यापीठातील वातावरण अत्यंत प्रसन्न बनले होते.
सकाळी साडेआठ वाजल्यापासून विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या भव्य अश्वारुढ पुतळा परिसरात पोवाडे लावण्यात आले होते. सकाळी ठीक साडेनऊ
वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवज्योत प्रज्वलित करून शिवज्योत रॅलीस प्रारंभ करण्यात
आला. मुख्य प्रशासकीय इमारतीपासून परीक्षा भवन, आरोग्य केंद्र, संगीत व नाट्यशास्त्र
अधिविभाग, कन्झ्युमर स्टोअर, विद्यार्थिनी वसतिगृह, भूगोल अधिविभाग अशी पुन्हा
मुख्य इमारत परिसरात दाखल झाली. येथे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ढोल, हलगीच्या
तालावर लेझीमचे सादरीकरण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा
परिसरात शिवपुतळ्याच्या प्रतिकृतीस कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील
यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाराजांच्या मूळ पुतळ्यासही
पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर
केले.
या उपक्रमात कुलसचिव डॉ. विलास शिंदे, मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.
महादेव देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन,
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी अजित
चौगुले, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, आजीवन अध्ययन
केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास केंद्राचे संचालक डॉ.
प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, माजी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर.
मोरे, राज्य कर्मचारी महासंघाचे महासचिव मिलींद भोसले यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय
अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment