Tuesday, 6 June 2023

शिवाजी विद्यापीठाच्या ‘एन.एस.एस.’कडून रायगडावर स्वच्छता मोहीम, प्लास्टिकमुक्ती

 

रायगड येथील श्रमसंस्कार शिबिरामध्ये सहभागी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसे्वकांशी संवाद साधताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. (सोबत) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. डी.आर. मोरे आदी.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी किल्ले रायगडावर केलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत १३,००० किलोंहून अधिक कचरा व प्लास्टीकचे संकलन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी किल्ले रायगडावर केलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत १३,००० किलोंहून अधिक कचरा व प्लास्टीकचे संकलन करण्यात आले.

 

 कोल्हापूर, दि. ६ जून: येथील शिवाजी विद्यापीठ आणि श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील पावणेदोनशेहून अधिक स्वयंसेवकांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर स्वच्छता मोहीम, प्लास्टिकमुक्ती अभियान आणि वाहतूक नियंत्रणासाठी मदत केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी रायगडावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि या उपक्रमास प्रोत्साहन दिले.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यापीठस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबिर दोन जून ते आठ जून या कालावधीत सुरू आहे. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त हे विशेष संस्कार शिबिर होत आहे.  या शिबिरांतर्गत शिवाजी विद्यापीठात आणि किल्ले रायगड येथे विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम आणि प्लास्टिक मुक्ती अभियान राबवले. या मोहिमेअंतर्गत सुमारे १३,००० किलोहून अधिक कचरा प्लास्टिकचे विद्यार्थ्यांनी संकलन केले. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक कचरा यांची ९० हून अधिक पोती संकलित करून पुनर्चक्रीकरणासाठी तो एकत्रित करून ठेवला. किल्ले रायगडावर  विद्यार्थ्यांनी श्रमदानही केले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन जीवनात वाटचाल करावी. महाराजांचे जल संवर्धन, वृक्ष संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाचे तत्त्व अंगीकारावे. योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांनी जीवनात वाटचाल करावी.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, माजी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, एन. एस. एस.चे संचालक डॉ. तानाजी चौगुले, नवयुग शिक्षण संकुल, महाडचे अध्यक्ष रंजीतसिंह भोसले, प्रशासकीय अधिकारी एस. एम. पालकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय सेवा यजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. के.म. देसाई, डॉ. ए. बी. बलुगडे, डॉ संदीप पाटील, डॉ. कुलकर्णी, डॉ. सयाजी, डॉ.संग्राम मोरे, प्रा. आशुतोष मगदूम, एस.ए. मुंडे, डॉ. पी.बी. पाटील यांनी संयोजन केले. शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. केदार फाळके यांनी शिवचरित्रावर आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी पर्यावरण आणि प्लास्टिक मुक्ती अभियान या संदर्भात विद्यार्थ्यांना व्याख्याने दिली. याउपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंद्रे, शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचेही प्रोत्साहन मिळाले.

एन. एस. एस. विभागाचे संचालक डॉ. चौगुले, डॉ. के. एम. देसाई डॉ..बी. बलुगडे यांनी संयोजन केले. डॉ.पी.बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सर्व प्रोग्रॅम अधिकारी व टीम लीडर यांनी विद्यार्थ्यांकडून श्रमदान करून घेतले. डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment