Monday 31 October 2022

शिवाजी विद्यापीठात एकता दौड

 

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन या निमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.


शिवाजी विद्यापीठात आयोजित एकता दौडीचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.



शिवाजी विद्यापीठात आयोजित एकता दौडीत सहभागी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक.

शिवाजी विद्यापीठात आयोजित एकता दौडीत सहभागी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक.


कोल्हापूर, दि. ३१ ऑक्टोबर: भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना आज शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत एकता दौडही आयोजित करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज सकाळी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी, विद्यापीठ प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यापासून एकता दौड आय़ोजित करण्यात आली. या दौडीस कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी ध्वज दाखवून उद्घाटन केले. दौडीनंतर सर्व उपस्थितांना एकता व सद्भावना यांची शपथ देण्यात आली.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, डॉ. पी.टी. गायकवाड, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीचे डॉ. किरण कुमार शर्मा यांच्यासह विविध महाविद्यालयांचे एनएसएस समन्वयक, शिक्षक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday 21 October 2022

‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’च्या ताज्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाचे ८० संशोधक

 कुलगुरू, प्र-कुलगुरूंचाही समावेश; विद्यापीठास देशात २५ वे स्थान

 

डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू


डॉ. प्रमोद पाटील, प्र-कुलगुरू

कोल्हापूर, दि. २१ ऑक्टोबर: .डी. सायंटिफिक इंडेक्सतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२मध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह एकूण ८० संशोधक-प्राध्यापकांचा समावेश झालेला आहे.

एच इंडेक्स, आय-१० इंडेक्स आणि विविध सायटेशन्सच्या आधारे काढण्यात आलेल्या या निर्देशांक यादीमध्ये मागील वर्षी असलेल्या संशोधकांनी त्यांचे स्थान कायम राखले असून यंदा आणखीही संशोधकांचा त्यात समावेश झालेला आहे. शिवाजी विद्यापीठास देशातील ११०३ शैक्षणिक संस्थांच्या यादीत देशात २५ वे स्थान प्राप्त झाले आहे. या यादीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचा एच-इंडेक्स हा सर्वाधिक म्हणजे ७९ इतका आहे तसेच, त्यांच्या संशोधनास ४६,४०८ इतकी प्रचंड सायटेशन्सही प्राप्त झाली आहेत. नॅक अ++ मानांकित शिवाजी विद्यापीठासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

एडी सायंटिफिक इंडेक्स (अल्पर-डोजर सायंटिफिक इंडेक्स), जर्नल्स आणि विद्यापीठांचे मूल्यमापन करणार्‍या इतर प्रणालींपेक्षा वेगळी आहे. यात शास्त्रज्ञांच्या संशोधनातील कामगिरी आणि वैयक्तिक वैज्ञानिक उत्पादकतेच्या अतिरिक्त मूल्यावर आधारित क्रमवारी आणि विश्लेषण करण्यात आले आहे. शिवाय शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक वैशिष्ट्यांवर आधारित संस्थांची क्रमवारी काढली जाते. एच-इंडेक्सच्या आधारे भारतातील ११०३ संस्थांच्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाने २५ वे स्थान मिळवले आहे. शिवाजी विद्यापीठ मटेरियल सायन्स संशोधनात सर्वोत्तम संस्थांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तथापि, सदरची क्रमवारी विविध विद्याशाखांमधील संशोधनावर आधारित आहे.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी संख्याशास्त्र विषयात संशोधन केले आहे. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांना भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान प्राप्त झाले आहे. सदर यादीत आजी-माजी संशोधकांसह देश-विदेशांत कार्यरत संशोधक विद्यार्थी-शिक्षकांसह निवृत्त प्राध्यापकांचाही समावेश आहे.

ए.डी. सायंटिफिक इंडेक्स २०२च्या यादीत स्थान लाभलेले शिवाजी विद्यापीठातील संशोधक पुढीलप्रमाणे- डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. पी.एस. पाटील, एस.पी. गोविंदवार, केशव राजपुरे, सी.एच. भोसले, आण्णासाहेब मोहोळकर, ज्योती जाधव, के.एम. गरडकर, संजय कोळेकर, अनिल घुले, एस.डी. डेलेकर, राजेंद्र सोनकवडे, एन. आय. तरवाळ, जी.बी. कोळेकर, विजया पुरी, एस.आर. सावंत, तुकाराम डोंगळे, प्रमोद वासंबेकर, राजेश्री साळुंखे, एम.बी. देशमुख, के.डी. सोनवणे, टी.जे. शिंदे, जॉन डिसूझा, गजानन राशिनकर, दिलीप दगडे, एस.बी. सादळे, मानसिंग टाकळे, पी.डी. राऊत, अशोक गडकरी, ए.के. साहू, संतोष पायघन, निखिल गायकवाड, किशोर कुचे, एम.व्ही. सांताकुमार, आर.आर. मुधोळकर, पी.बी. दंडगे, राहुल रणवीर, दत्तात्रय गायकवाड, किरणकुमार शर्मा, नीरज राणे, पंकज पवार, नीलम डिगे, टी.व्ही. साठे, एन.आर. प्रसाद, अनंत दोड्डमणी, उत्कर्ष मोरे, एन.एस. चव्हाण, एस.जी. घाणे, सतीश पाटील, सोनल चोंदे, विजय कोरे, एस.एस. कांबळे, निरंजना चव्हाण, सुहास कदम, क्रांतीवीर मोरे, आर.व्ही. गुरव, एस.आर. यंकंची, आसिफ तांबोळी, व्ही.ए. सावंत, चेतन आवारे, शशीभूषण महाडिक, सचिन पन्हाळकर, एम.एम. डोंगरे, संभाजी शिंदे, कबीर खराडे, प्रयागराज फांदीलोलू, एम.पी. भिलावे, हेमांगी कुलकर्णी, नितीन कांबळे, सुरेश सूर्यवंशी, जयवंत पाताडे, मिलींद सुतार, मेधा नानिवडेकर, इराण्णा उडचण, कविता ओझा, एस.एम. गायकवाड, पी.एस. कांबळे, विनायक विठ्ठल गावडे.

संशोधनाचा टक्का व गुणवत्ता अधोरेखित: कुलगुरू डॉ. शिर्के

ए.डी. सायंटिफीक इंडेक्स क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाचे गतवर्षी ४८ संशोधक होते. ही संख्या आता जवळपास दुप्पट झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यात विज्ञान विषयांव्यतिरिक्त विद्याशाखांमधील संशोधकांचाही समावेश झालेला आहे. स्टॅनफोर्डच्या दोन टक्के संशोधकांमध्ये स्थान प्राप्त झाल्याच्या बातमीपाठोपाठ आता ए.डी. सायंटिफीक इंडेक्समध्येही शिवाजी विद्यापीठातील संशोधकांची संख्या वाढल्यामुळे विद्यापीठातील संशोधनाचा टक्का आणि त्या संशोधनाची गुणवत्ता या दोन्ही बाबी अधोरेखित झाल्या आहेत. या सर्व संशोधकांच्या कामगिरीचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

Thursday 20 October 2022

शिवाजी विद्यापीठात प्रवेशित परदेशी विद्यार्थ्यांकडून दिवाळी साजरी

शिवाजी विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांसाठी आयोजित दिवाळी साजरीकरण कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत मान्यवर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित  दिवाळी साजरीकरण कार्यक्रमात रांगोळी काढून दीप प्रज्वलित करताना परदेशी विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित  दिवाळी साजरीकरण कार्यक्रमात दीप प्रज्वलित करताना परदेशी विद्यार्थी- विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित  दिवाळी साजरीकरण कार्यक्रमात दीप प्रज्वलित करताना परदेशी विद्यार्थी- विद्यार्थिनी.


परदेशी विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त मिठाईवाटप करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.


शिवाजी विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक, मार्गदर्शक आणि मान्यवर.

कोल्हापूर, दि. २० ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठात प्रवेशित परदेशी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी साजरीकरणाच्या विशेष कार्यक्रमाचे काल रात्री आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या अतिथीगृहात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमस्थळी परदेशी विद्यार्थ्यांच्या सहभागातूनच आकर्षक रांगोळीछोटे-मोठे कंदील लावून सजावट करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी परिसरात पणत्या प्रज्वलित करून प्रकाशाच्या या सोहळ्यास प्रारंभ केला.

कार्यक्रमात इंटरनॅशनल अफेअर्स कक्षाचे संचालक डॉ. एस.बी. सादळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्तेही पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. प्र-कुलगुरूंच्या हस्ते यावेळी नूतन संचालक डॉ. सादळे यांच्यासह मावळते संचालक डॉ. अनिल घुले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठातून पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल इराकचा विद्यार्थी रियाध राद अब्बॉद अल्बुरी याचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते सर्व परदेशी विद्यार्थ्यांना मिठाईवाटप करण्यात आले.

कार्यक्रमास परदेशी विद्यार्थ्यांचे संशोधन मार्गदर्शक अधिविभागप्रमुखटास्क फोर्स समिती सदस्यसंलग्नित महाविद्यालयातील समन्वयक उपस्थित होते. डॉ. जे. बी. यादव यांनी आभार मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 


Sunday 16 October 2022

जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे दहा प्राध्यापक

पदार्थविज्ञानाच्या ४ शिक्षकांसह २५ माजी विद्यार्थ्यांचाही समावेश

 

जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांमध्ये स्थान प्राप्त केलेल्या शिवाजी विद्यापीठातील संशोधक-प्राध्यापकांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह मान्यवर अधिकारी.



अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ताज्या क्रमवारीतील मानांकन

कोल्हापूर, दि. १६ ऑक्टोबर: जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची ताजी यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच जाहीर केली असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या दहा संशोधकांना मानांकन प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे यामध्ये पदार्थविज्ञान अधिविभागातील चार संशोधकांसह २५ माजी विद्यार्थ्यांनाही स्थान लाभले आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाने गत वर्षी जाहीर केलेल्या जागतिक स्तरावरील दोन टक्के आघाडीच्या संशोधकांच्या यादीमध्येही शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना स्थान लाभले होते. यंदाही त्यांना पुनर्मानांकन लाभले आहे. या यादीमध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. पी.एस. पाटील (पदार्थविज्ञान), प्रा. केशव राजपुरे (पदार्थविज्ञान), प्रा. ए.व्ही. राव (पदार्थविज्ञान), प्रा. एस.पी. गोविंदवार (पदार्थविज्ञान), डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र), डॉ. ए.व्ही. मोहोळकर (पदार्थविज्ञान), प्रा. हेमराज यादव (रसायनशास्त्र), डॉ. सचिन ओतारी (नॅनोतंत्रज्ञान), प्रा. के.एम. गरडकर (रसायनशास्त्र), प्रा. तुकाराम डोंगळे (इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स) यांचा समावेश आहे.

स्कोपसडेटाबेसवर आधारित एल्सव्हिअरने तयार केलेल्या या यादीसाठी सन १९६० ते २०२ या कालावधीमध्ये संशोधकीय योगदान देणाऱ्या संशोधकांचा सार्वकालिक कामगिरी आणि वार्षिक कामगिरी अशा दोन निकषांवर विचार करण्यात आला आहे. २२ विज्ञान विषय आणि १७६ उपविषयांमधील संशोधनाची दखल त्याअंतर्गत घेतली गेली आहे. शोधनिबंधांची संख्या आणि दर्जा, संशोधन पत्रिकेचा दर्जा, शोधनिबंधाला प्राप्त झालेली सायटेशन्स, एकच लेखक असणारे शोधनिबंध, स्वतःची सायटेशन्स वगळून असणारे शोधनिबंध अशा अनेक काटेकोर निकषांवर आधारित ही यादी जाहीर केली जाते.

महत्त्वाची बाब म्हणजे २०२२च्या जागतिक आघाडीच्या २% संशोधकांच्या डेटाबेसमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाचे चार शिक्षक आणि तब्बल २५ माजी विद्यार्थी झळकले आहेत. त्यापैकी बहुतेकजण आता परदेशात पोस्ट डॉक्टरेट करत आहेत. ही विभागाच्या आणि विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह बाब आहे.

करिअर परफॉर्मन्स अर्थात सार्वकालिक कामगिरीच्या यादीत प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, निवृत्त शिक्षक डॉ. ए. व्यंकटेश्वरा राव, डॉ. सी.डी. लोखंडे, अधिविभागप्रमुख डॉ. के.वाय. राजपुरे, डॉ. आर.एस. माने, डॉ. बी.आर. संकपाळ, डॉ. दिपक डुबल आणि डॉ. संभाजी एस.शिंदे यांचा समावेश आहे. तर, वार्षिक कामगिरीच्या डेटाबेसमध्ये उपरोक्त संशोधकांसह पुढील संशोधकांनी स्थान मिळवले आहे: डॉ. ए.व्ही. मोहोळकर, डॉ. आर.एस. देवण, डॉ. व्ही.एल. मथे, डॉ. एच.एम. पठाण, डॉ. एस.एम. पवार, डॉ. आर.आर. साळुंखे, डॉ. वाय.एम. हुंगे, डॉ. एस.एस.माळी, डॉ. आर.सी. कांबळे, डॉ. एस.एस. लठ्ठे, डॉ. एन. आर. चोडणकर, डॉ. एस.जे. पाटील, डॉ. एस.के. शिंदे, डॉ. अकबर आय. इनामदार, डॉ. गिरीश गुंड, डॉ. आर.सी. पवार, डॉ. उमाकांत एम. पाटील, डॉ. ए.डी. जगदाळे आणि डॉ. एम.पी. सूर्यवंशी.

 

सातत्यपूर्ण संशोधनातून साधलेली कामगिरी विद्यापीठास भूषणावह: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठातील दहा शिक्षक जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीमध्ये स्थान प्राप्त करतात, ही बाब एका रात्रीत साध्य झालेली नाही. त्यामागे त्यांचे सातत्यपूर्ण संशोधकीय परिश्रम आहेत. त्यामुळेच ते सलगपणाने या यादीमधील आपले स्थान अबाधित राखू शकले आहेत. ही बाब विद्यापीठास अत्यंत भूषणावह आहे. तसेच, नवसंशोधकांना प्रेरणा देणारी आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी काल काढले.

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून या संशोधकांचा काल सायंकाळी विद्यापीठ कार्यालयात गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह डॉ. के.वाय. राजपुरे, डॉ.ज्योती जाधव, डॉ. ए.व्ही. मोहळकर, डॉ. के.एम. गरडकर,  डॉ. टी.डी. डोंगळे, डॉ. हेमराज यादव, डॉ. सचिन ओतारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.सरिता ठकार, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एम.एस. देशमुख, क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, बॅ. बाळासाहेब ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ.धनंजय सुतार आदी उपस्थित होते.

Saturday 15 October 2022

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती

शिवाजी विद्यापीठात उत्साहात

 


कोल्हापूर, दि. १५ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठात आज भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आज सकाळी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday 4 October 2022

‘राणादा बदाम थंडाई’चे शिवाजी विद्यापीठात उद्घाटन

 सेक्शन-८ कंपनीमार्फत नवउद्योगास पाठबळ

 

शिवाजी विद्यापीठाच्या सेक्शन-८ कंपनीमार्फत नवउद्योगांना पाठबळ उपक्रमांतर्गत 'राणादा बदाम थंडाई'चे उद्घाटन करताना संभाजीराजे छत्रपती आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. विलास शिंदे, डॉ. मेघा गुळवणी, डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. एम.एस. देशमुख, धनंजय वडेर आणि त्यांचे कुटुंबीय व डॉ. प्रकाश पवार.

कोल्हापूर, दि. ४ ऑक्टोबर: महाराष्ट्र स्टार्टअपच्या माध्यमातून नवसंकल्पना नव व्यवसायाच्या संधी युवकांना उपलब्ध होत आहेत. राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यता सोसायटी शिवाजी विद्यापीठाच्या एसयुके रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन या सेक्शन 8 कंपनीमार्फत 15 नवउद्योगांच्या पंखांना बळ दिले आहे. त्याअंतर्गत धनंजय वडेर यांनी 'राणादा फुड्स एलएलपी' ही कंपनी सुरू झाली असून या कंपनीतर्फे 'बदाम थंडाई' हे पेय तयार केले आहे. याकरिता सिनेअभिनेता हार्दिक जोशी हे कंपनीचे सदिच्छादूत आहे.

बदाम थंडाई ही कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्राची ओळख आहे. पैलवानांकरीता हे पेय म्हणजे अमृतच आहे. अलिकडचे सेलिब्रीटी न्यूट्रिशनिस्ट ऋतुजा दिवेकर यांनी या पेयाचे फायदे सांगितले आहेत. त्यामुळे या पेयास मागणी वाढत असून राणादा बदाम थंडाई आता प्रदूषणविरहित गाडीमधून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देणार आहेत. या गाडीत थंडाई पारंपरिक पध्दतीने थंड करून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामागचा उद्देश एकच आहे की कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त रोजगार मिळवून देता येईल.

      'राणादा थंडाई' या शून्य प्रदूषण गाडीचे उद्धाटन शिवाजी विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन साहचर्य केंद्र येथे झाले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले की, अशा प्रकारचे पारंपरि उद्योग नव्या स्वरूपात तरूणाई आणत असून स्वत:चा व्यवसाय सुरू करून त्यामध्ये इतरांना व्यवसाय देण्याचे काम करीत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अशा व्यवसायाच्या फ्रॅन्चाइजी युवकांनी घेतल्यास बेरोजगारी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

या समारंभास प्रमुख उपस्थित असणारे छत्रपती संभाजीराजे यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. ते म्हणाले, या इन्क्यूबेशन सेंटर च्या माध्यमातून  नविन स्टार्टअप ना प्रोत्साहन मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. असे नव्या या पध्दतीचे व्यवसाय सुरू केल्यास त्यास आपण नक्कीच प्रोत्साहन देऊ, असे सांगितले.

सदर उद्धाटन प्रसंगी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. त्यांनीही या उपक्रमास शुभेच्छा देऊन शासनाकडूनही मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, अधिष्ठाता नवोपक्रम, नवसंशोधन साहचर्य केंद्राचे संचालक डॉ एम.एस. देशमुख, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रकाश पवार आदी उपस्थित होते.