शिवाजी विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांसाठी आयोजित दिवाळी साजरीकरण कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत मान्यवर. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित दिवाळी साजरीकरण कार्यक्रमात रांगोळी काढून दीप प्रज्वलित करताना परदेशी विद्यार्थिनी. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित दिवाळी साजरीकरण कार्यक्रमात दीप प्रज्वलित करताना परदेशी विद्यार्थी- विद्यार्थिनी. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित दिवाळी साजरीकरण कार्यक्रमात दीप प्रज्वलित करताना परदेशी विद्यार्थी- विद्यार्थिनी. |
कोल्हापूर, दि. २० ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठात प्रवेशित परदेशी
विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी साजरीकरणाच्या विशेष कार्यक्रमाचे
काल रात्री आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या अतिथीगृहात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमस्थळी परदेशी विद्यार्थ्यांच्या
सहभागातूनच आकर्षक रांगोळी, छोटे-मोठे
कंदील लावून सजावट करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी परिसरात पणत्या प्रज्वलित करून
प्रकाशाच्या या सोहळ्यास प्रारंभ केला.
कार्यक्रमात इंटरनॅशनल अफेअर्स कक्षाचे संचालक
डॉ. एस.बी. सादळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. पाटील
यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्तेही पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. प्र-कुलगुरूंच्या
हस्ते यावेळी नूतन संचालक डॉ. सादळे यांच्यासह मावळते संचालक डॉ. अनिल घुले यांचाही
सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठातून पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल
इराकचा विद्यार्थी रियाध राद अब्बॉद अल्बुरी याचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्र-कुलगुरू
डॉ. पाटील यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते सर्व परदेशी
विद्यार्थ्यांना मिठाईवाटप करण्यात आले.
कार्यक्रमास परदेशी विद्यार्थ्यांचे संशोधन
मार्गदर्शक, अधिविभागप्रमुख, टास्क फोर्स समिती सदस्य, संलग्नित महाविद्यालयातील समन्वयक उपस्थित होते. डॉ.
जे. बी. यादव यांनी आभार मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment