Friday 21 October 2022

‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’च्या ताज्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाचे ८० संशोधक

 कुलगुरू, प्र-कुलगुरूंचाही समावेश; विद्यापीठास देशात २५ वे स्थान

 

डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू


डॉ. प्रमोद पाटील, प्र-कुलगुरू

कोल्हापूर, दि. २१ ऑक्टोबर: .डी. सायंटिफिक इंडेक्सतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२मध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह एकूण ८० संशोधक-प्राध्यापकांचा समावेश झालेला आहे.

एच इंडेक्स, आय-१० इंडेक्स आणि विविध सायटेशन्सच्या आधारे काढण्यात आलेल्या या निर्देशांक यादीमध्ये मागील वर्षी असलेल्या संशोधकांनी त्यांचे स्थान कायम राखले असून यंदा आणखीही संशोधकांचा त्यात समावेश झालेला आहे. शिवाजी विद्यापीठास देशातील ११०३ शैक्षणिक संस्थांच्या यादीत देशात २५ वे स्थान प्राप्त झाले आहे. या यादीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचा एच-इंडेक्स हा सर्वाधिक म्हणजे ७९ इतका आहे तसेच, त्यांच्या संशोधनास ४६,४०८ इतकी प्रचंड सायटेशन्सही प्राप्त झाली आहेत. नॅक अ++ मानांकित शिवाजी विद्यापीठासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

एडी सायंटिफिक इंडेक्स (अल्पर-डोजर सायंटिफिक इंडेक्स), जर्नल्स आणि विद्यापीठांचे मूल्यमापन करणार्‍या इतर प्रणालींपेक्षा वेगळी आहे. यात शास्त्रज्ञांच्या संशोधनातील कामगिरी आणि वैयक्तिक वैज्ञानिक उत्पादकतेच्या अतिरिक्त मूल्यावर आधारित क्रमवारी आणि विश्लेषण करण्यात आले आहे. शिवाय शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक वैशिष्ट्यांवर आधारित संस्थांची क्रमवारी काढली जाते. एच-इंडेक्सच्या आधारे भारतातील ११०३ संस्थांच्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाने २५ वे स्थान मिळवले आहे. शिवाजी विद्यापीठ मटेरियल सायन्स संशोधनात सर्वोत्तम संस्थांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तथापि, सदरची क्रमवारी विविध विद्याशाखांमधील संशोधनावर आधारित आहे.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी संख्याशास्त्र विषयात संशोधन केले आहे. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांना भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान प्राप्त झाले आहे. सदर यादीत आजी-माजी संशोधकांसह देश-विदेशांत कार्यरत संशोधक विद्यार्थी-शिक्षकांसह निवृत्त प्राध्यापकांचाही समावेश आहे.

ए.डी. सायंटिफिक इंडेक्स २०२च्या यादीत स्थान लाभलेले शिवाजी विद्यापीठातील संशोधक पुढीलप्रमाणे- डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. पी.एस. पाटील, एस.पी. गोविंदवार, केशव राजपुरे, सी.एच. भोसले, आण्णासाहेब मोहोळकर, ज्योती जाधव, के.एम. गरडकर, संजय कोळेकर, अनिल घुले, एस.डी. डेलेकर, राजेंद्र सोनकवडे, एन. आय. तरवाळ, जी.बी. कोळेकर, विजया पुरी, एस.आर. सावंत, तुकाराम डोंगळे, प्रमोद वासंबेकर, राजेश्री साळुंखे, एम.बी. देशमुख, के.डी. सोनवणे, टी.जे. शिंदे, जॉन डिसूझा, गजानन राशिनकर, दिलीप दगडे, एस.बी. सादळे, मानसिंग टाकळे, पी.डी. राऊत, अशोक गडकरी, ए.के. साहू, संतोष पायघन, निखिल गायकवाड, किशोर कुचे, एम.व्ही. सांताकुमार, आर.आर. मुधोळकर, पी.बी. दंडगे, राहुल रणवीर, दत्तात्रय गायकवाड, किरणकुमार शर्मा, नीरज राणे, पंकज पवार, नीलम डिगे, टी.व्ही. साठे, एन.आर. प्रसाद, अनंत दोड्डमणी, उत्कर्ष मोरे, एन.एस. चव्हाण, एस.जी. घाणे, सतीश पाटील, सोनल चोंदे, विजय कोरे, एस.एस. कांबळे, निरंजना चव्हाण, सुहास कदम, क्रांतीवीर मोरे, आर.व्ही. गुरव, एस.आर. यंकंची, आसिफ तांबोळी, व्ही.ए. सावंत, चेतन आवारे, शशीभूषण महाडिक, सचिन पन्हाळकर, एम.एम. डोंगरे, संभाजी शिंदे, कबीर खराडे, प्रयागराज फांदीलोलू, एम.पी. भिलावे, हेमांगी कुलकर्णी, नितीन कांबळे, सुरेश सूर्यवंशी, जयवंत पाताडे, मिलींद सुतार, मेधा नानिवडेकर, इराण्णा उडचण, कविता ओझा, एस.एम. गायकवाड, पी.एस. कांबळे, विनायक विठ्ठल गावडे.

संशोधनाचा टक्का व गुणवत्ता अधोरेखित: कुलगुरू डॉ. शिर्के

ए.डी. सायंटिफीक इंडेक्स क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाचे गतवर्षी ४८ संशोधक होते. ही संख्या आता जवळपास दुप्पट झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यात विज्ञान विषयांव्यतिरिक्त विद्याशाखांमधील संशोधकांचाही समावेश झालेला आहे. स्टॅनफोर्डच्या दोन टक्के संशोधकांमध्ये स्थान प्राप्त झाल्याच्या बातमीपाठोपाठ आता ए.डी. सायंटिफीक इंडेक्समध्येही शिवाजी विद्यापीठातील संशोधकांची संख्या वाढल्यामुळे विद्यापीठातील संशोधनाचा टक्का आणि त्या संशोधनाची गुणवत्ता या दोन्ही बाबी अधोरेखित झाल्या आहेत. या सर्व संशोधकांच्या कामगिरीचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment