कोल्हापूर, दि. ३०
जून: शिवाजी विद्यापीठामधील
वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या स्वतंत्र इमारतीचे भूमीपूजन आज कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यापीठाने नुकतेच यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीचे
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन केले.
त्याच्या शेजारीच फॅकल्टी डेव्लपमेंट सेंटर फॉर सायबर सिक्युरिटीच्या शेजारी
असलेल्या जागेमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या स्वतंत्र इमारतीचे
भूमीपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी भूमीपूजन करून पहिली कुदळ मारुन बांधकामास
प्रारंभ केला.
या इमारतीला तळमजला आणि दोन मजले असणार असून पहिल्या टप्प्यामध्ये तळमजल्याचे
काम प्रस्तावित आहे. या इमारतीचे
क्षेत्रफळ १४५१.७४ चौ.मी. इतके असेल. विद्यापीठाच्या स्वनिधीतून होत असलेल्या या
इमारतीसाठी ६ कोटी ३८ लाख ५८ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. इमारतीच्या
कामाचे वास्तुविशारद विशाल पाटील (पुणे) असून शिवप्रसाद कन्स्ट्रक्शन ठेकेदार
आहेत. सदरचे बांधकाम हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून
करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन
विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे
अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आजीवन अध्ययन केंद्राचे डॉ. रामचंद्र पवार, डॉ. आण्णासाहेब गुरव, डॉ. दीपा इंगवले, उपकुलसचिव
रमेश लिधडे, उपकुलसचिव (स्थापत्य) रणजीत यादव, उपअभियंता (विद्युत) अमित कांबळे, डॉ.
गिरीष कुलकर्णी, रमेश पोवार, सदानंद सबनीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक
अभियंता श्याम कुंभार, कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील, उपअभियंता हे.मा. जोशी, ठेकेदार अमर जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि
विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment