कोल्हापूर, दि.23 फेब्रुवारी - शिवाजी विद्यापीठात आज संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाप्रमुख डॉ.ए.एम.गुरव, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ.रामचंद्र पोवार, तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ.शिवलिंगप्पा सपली, डॉ.केदार मारूलकर, डॉ.दीपा इंगवले, डॉ.रामदास बोलके, डॉ.टी.सी.घोडके, डॉ.दिपाली पाटील, डॉ.जयश्री लोखंडे, सचिन चौगुले, समीर गावडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, आज संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध अधिविभागांसह प्रशासकीय विभागाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
No comments:
Post a Comment