Friday, 10 April 2015

फ्लोरेन्सवासियांनी जपलाय राजाराम महाराज यांच्या स्मृतींचा गंध!

करवीरच्या छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचा फ्लोरेन्स (इटली) येथील अर्धपुतळा

करवीरच्या छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे फ्लोरेन्स (इटली) येथील स्मारक

करवीरच्या छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे फ्लोरेन्स (इटली) येथील स्मारक. मागे त्यांचेच नाव देण्यात आलेला इंडियाना ब्रीज

करवीरच्या छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांचे नाव देण्यात आलेला फ्लोरेन्स (इटली) येथील इंडियाना ब्रिज (ऑफ प्रिन्स राजाराम महाराज).

करवीरच्या छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांच्या फ्लोरेन्स (इटली) येथील स्मारकाचे दर्शन घेताना हिंदी अधिविभाग प्रमुख प्रा. पद्मा पाटील.

इटलीतील तुरिन विद्यापीठात शोधनिबंध सादर करताना प्रा. पद्मा पाटील.

इटलीतील परिषदेत सहभागी झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अधिविभाग प्रमुख प्रा. पद्मा पाटील.


कोल्हापूर, दि. १० एप्रिल: फ्लोरेन्स (इटली) येथील प्रशासनाने ज्या प्रेमाने छत्रपती राजाराम महाराज यांच्या स्मृतिस्थळाचे जतन केलेले आहे, ते पाहून अक्षरशः गहिवरुन आले, अशी भावना शिवाजी विद्यापीठातील हिंदी अधिविभाग प्रमुख प्रा. पद्मा पाटील यांनी व्यक्त केली.

प्रा. पाटील या इटली येथील तुरिनो विद्यापीठाच्या निमंत्रणावरुन तेथे आंतरराष्ट्रीय परिषदेस सहभागी होण्यासाठी नुकत्याच जाऊन आल्या. त्या वेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे आजोबा छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) (१८५०-१८७०) यांच्या फ्लोरेन्स येथील समाधीस्थळाचे आवर्जून दर्शन घेतले. या भेटीबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.

प्रा. पद्मा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम महाराज १८७० साली युरोपचा अभ्यास दौऱ्या दरम्यान इटली येथील मुक्कामी आजारी पडले आणि तेथेच त्यांचे निधन झाले. इटलीमधील अर्न नदी मुगनोने प्रवाह यांच्या संगमस्थळी वसलेल्या केसीन पार्क याठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याठिकाणी मूर्तीकार जी.एफ. फ्यूलर यांनी १८७४ मध्ये राजाराम महाराज यांचा अप्रतिम अर्धाकृती पुतळा छत्री उभारली; तर, अभियंता माँट यांनी उत्तम स्मारक साकारले. पुतळ्याच्या चारही बाजूंवर इटालवी (रोमन), इंग्रजी, मराठी (देवनागरी) गुरूमुखी (पंजाबी) या भाषांमध्ये महाराजांबद्दल माहिती कोरली आहे. १६० हेक्टर जागेवरील हे स्मारक 'इंडियाना मोनुमेंट' या नावाने ओळखले जाते. तसेच, या ठिकाणाच्या जवळून वाहणाऱ्या अर्न नदीवरील पूल 'इंडियाना ब्रिज (ऑफ प्रिन्स राजाराम महाराज)' या नावाने ओळखला जातो. इटलीच्या जनतेची स्मृती स्मारकाच्या माध्यमातून वारसा जपण्याची राखण्याची दुर्दम्य इच्छा वृत्तीची प्रचिती या निमित्ताने आली. या दौऱ्याअंतर्गत व्हॅटिकन सिटीमधील संग्रहालये, मायकेल अँजेलोचे घर, त्याच्या अजरामर कलाकृती, दांते कांट या कवींची घरे तथा संग्रहालये तसेच रोमन वास्तुशास्त्राची प्रचिती देणाऱ्या अनेक इमारती पाहिल्या; तथापि, कोल्हापूरच्या महाराजांचा पुतळा स्थापित करून त्यांच्या स्मृती इतक्या सुव्यवस्थित पद्धतीने जोपासल्याचे पाहून मनाला लाभलेले समाधान वेगळेच आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया प्रा. पाटील यांनी व्यक्त केली. कोल्हापूर इटलीचे संबंध दृढ करण्याचा प्रयत्न या राजाने केला होता. अभियांत्रिकी वास्तुशास्त्र या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने हा प्रयत्न करण्यात आला होता, हे तेथील स्थानिक नागरिक मोठ्या अभिमानाने सांगतात. या लोकांची कृतज्ञता पाहून भारावून गेले. शिवाय, या स्मारकाची देखरेख १८७४ पासून फ्लोरेन्स शहराच्या नगरपालिकेकडून करण्यात येत असल्याचेही प्रा. पाटील यांनी सांगितले.

 

तुरिनो विद्यापीठाशी सामंजस्य कराराचा होणार विद्यार्थ्यांना लाभ

प्रा. पद्मा पाटील यांनी इटलीच्या तुरिनो विद्यापीठात 'कल्चरल इमेजिस ऑफ व्हेजिटेबल किंगडम इन लिटरेचर: सिम्बॉलिक अस्पेक्ट्स ॲन्ड इंटरप्रिटीव्ह ॲप्रोचेस' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठ तुरिन विद्यापीठ यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराची कागदपत्रे विद्यापीठाच्या वतीने स्वीकारली. या सामंजस्य कराराअंतर्गत शिवाजी विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थी यांना तुरिनो विद्यापीठाशी समन्वय साधून शैक्षणिक संशोधन करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तुरिनो विद्यापीठात हिंदी भाषेचा बी.., एम.. तसेच पी.एच.डी.चा अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. यांमधील निवडक विद्यार्थ्यांच्या शिवाजी विद्यापीठास भेटीने या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीस प्रारंभ होणार आहे. या विद्यापीठात सध्या सुमारे ३५ विद्यार्थी हिंदी शिकत असून ते अत्यंत अस्खलित हिंदी बोलतात, तसेच त्यांचे लेखन कौशल्यही वाखाणण्यासारखे आहे, अशी माहितीही प्रा. पाटील यांनी दिली.

 

No comments:

Post a Comment