तंत्रज्ञान अधिविभाग परिसरात वृक्षारोपण करताना कुलगुरू, प्र-कुलगुरू व इतर मान्यवर. |
पर्यावरण शास्त्र अधिविभाग परिसरात वृक्षारोपण करताना कुलगुरू, प्र-कुलगुरू व इतर मान्यवर. |
कोल्हापूर, दि. ५ जून: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज सकाळी शिवाजी
विद्यापीठात तंत्रज्ञान आणि पर्यावरणशास्त्र या दोन्ही अधिविभागांच्या परिसरात कुलगुरू
डॉ. एन.जे. पवार आणि प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात
आले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज सकाळी तंत्रज्ञान अधिविभागाच्या
परिसरात कुलगुरूंसह अन्य मान्यवरांच्या हस्ते महोगनीची सुमारे ५० रोपे लावण्यात आली.
त्यानंतर दहा वाजता पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या परिसरात कैलासपतीची रोपे लावण्यात
आली. झटपट वाढणारी आणि चांगली सावली देणारी ही रोपे आहेत. पर्यावरणशास्त्र, जीव-रसायनशास्त्र,
सूक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान अधिविभागांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात
आला.
यावेळी कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी.
पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी
संचालक डॉ.जी.एस. कुलकर्णी, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्रा.डॉ. पी.डी. राऊत, प्रा.डॉ.
एस.पी. गोविंदवार, प्रा.डॉ. एस.आर. यादव, डॉ. जे.पी. जाधव, डॉ. के.डी. सोनावणे, डॉ.
ए.डी. जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment