Monday 1 July 2019

शिवाजी विद्यापीठात वृक्षलागवड मोहीम उत्साहात


शिवाजी विद्यापीठात वृक्षारोपण मोहिमेस प्रारंभ करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

शिवाजी विद्यापीठात वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

शिवाजी विद्यापीठात वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करताना अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत.

शिवाजी विद्यापीठात सोमवारी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. पी.टी. गायकवाड, डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी.


कोल्हापूर, दि. १ जुलै: महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भातील आवाहनाला प्रतिसाद देत शिवाजी विद्यापीठाने आज आपल्या परिसरात वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ केला. मोहिमेअंतर्गत विद्यापीठात ४०० रोपे लावण्यात येणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते या वृक्षारोपण मोहिमेस आज प्रारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने गेल्या चार वर्षांपासून वृक्षारोपण मोहिमेचा परीघ टप्प्याटप्प्याने वाढविला आहे. वृक्षारोपणाबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन या मोहिमेला दरवर्षी वाढता आणि उत्साही प्रतिसाद लाभत आहे. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या बाबतीतही नागरिकांत मोठी जागृती झाली आहे. शिवाजी विद्यापीठानेही सुरवातीपासून या मोहिमेला प्रतिसाद देताना आपल्या परिसरामध्ये वृक्षलागवड, त्यांचे संरक्षण व संवर्धन या बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविले आहे. दरवर्षी विद्यापीठ परिसराच्या निरनिराळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावून संपूर्ण परिसरामधील हिरवे क्षेत्र वाढविण्याकडे विद्यापीठ प्रशासनाने लक्ष पुरविले आहे.
यंदाही विद्यापीठाने वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ केला असून आज सकाळी आठ वाजता विद्यापीठाच्या मेघनाद नागेशकर क्रीडा संकुल परिसरात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते कडुलिंब रोप लागवड मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, आंतरविद्याशाखीय अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, अधीक्षक ए.के. जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच सकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांनीही वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला.


No comments:

Post a Comment