कोल्हापूर, दि. ४ ऑगस्ट: जलविज्ञानाचे शास्त्र उन्नत करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी याकडे संधी म्हणून पाहिली पाहिजे. आपत्ती टाळण्यासाठी पूरग्रस्त भागाचे नकाशे अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करणे अत्यंत निकडीचे आहे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या पर्ड्यू विद्यापीठातील प्रा.व्यंकटेश मेरवाडे यांनी आज येथे केले.
Prof. Vyankatesh Merwade |
प्रा. मेरवाडे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन या जागतिक समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारी संस्था तसेच विशेषज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. नैसर्गिक आपत्तींमुळे अमेरिकला प्रतिवर्षी सहा अब्ज रूपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे भारतातही मोठ्या प्रमाणात हानी होते. हे टाळण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्ण उपयोग करणे आवश्यक आहे. पुराचे अचूक पूर्वानुमान लावण्यासाठी यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. अमेरिकेत फेडरल इमर्जन्सी या संस्थेकडून पुराबाबत माहिती घेतली जाते. भारतात येणाऱ्या पुरांचे अथवा पावसाचे योग्य अंदाज बांधून येथील गटारींचे, नाल्यांचे व्यवस्थापन मजबूत करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्याकडे पडणाऱ्या पावसाच्या नोंदी संबंधित संस्थेस कळविल्यास भविष्यामधील मोठी हानी टाळता येणे शक्य आहे.
ProVC Dr. D.T. Shirke |
सुरवातीला कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते अधिविभागातील विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये कौशल्य प्राप्त होण्यासाठी तीस टॅबचे वितरण करण्यात आले. भूगोल अधिविभागप्रमुख डॉ.सचिन पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पी.टी. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा.विद्या अजित चौगुले यांनी आभार मानले, तर डॉ. एम.बी. पोतदार यांनी सूचसंचालन केले. यावेळी श्री.मुस्तफा, डॉ. सी.टी. पवार, डॉ. एस.बी. देशमुख, डॉ.रमोत्रा, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, डॉ. पी.के. दत्ता यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथून आलेले तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment