कोल्हापूर, दि. १६
ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्य दिन काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात
आला.
विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात
आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक
सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त
व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ.
ए.एम. गुरव, डॉ. भारती पाटील, इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. आर.के.
कामत, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ.
पी.टी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह शिक्षण,
प्रशासकीय अधिकारी व सेवक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment