Saturday, 1 September 2018

प्रशासकीय कामाचा निपटारा सुलभतेने व जबाबदारपूर्वक होणे आवश्यक: डॉ. विलास नांदवडेकर


कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकरडॉ. एच.एम. ठकारडॉ. गणेश मांझाअजित चौगुले 

कोल्हापूर, दि. 1 सप्टेंबर: प्रशासनामधील प्रचलि कार्यप्रणालीच्या माध्यमातून कामाचा निपटारा सहज, सुलभतेने जबाबदारपूर्वक व्हावा, हा उद्देश जोपासून कर्मचाऱ्यांनी योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपाद शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या एम.बी.ए. अधिविभागातर्फे 'ॲकॅडमी ऑफ ॲकॅडेमि ॲडमिनिस्ट्रेटर्स' या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ॲकॅडमी ऑफ ॲकॅडमीक ॲडमिनीस्ट्रेशन, मुंबई अंतर्गत आयोजित या पहिल्या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीस्थानावरून कुलसचिव बोलत होते. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. गणेश मांझा प्रमुख उपस्थित होते.
कुलसचिव डॉ.नांदवडेकर म्हणाले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय सेवक, अधिकारी यांना प्रशासकीय कामकाजाच्या अद्यावत द्धतीची माहिती करवून देण्यासाठी ही अकादमी स्थापन झालेली आहे. भविष्या राज्य राष्ट्रीय पातळीवरील सर्व स्तरावरील प्रशासकीय सेवक, अधिकाऱ्यांसाठी एक ते चार दिवसांच्या अशा द्धतीच्या मार्गदर्शनपर कार्यशाळांचे अयोजन करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. यामुळे वेगवेगळ्या आस्थापनावरील प्रशिक्षित सेवक, अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे सुलभ होईल.
ते पुढे म्हणाले, कार्यालयीन कामकाजामध्ये महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट, 2016 न्वये घ्यावयाच्या निर्णयाची सुरूवात धीक्षक पातळीपासून होते. त्यामुळे पूर्ण क्षमतेने व जबाबदारीने विविध विषयांवरील टिपणींचे सादरीकरण संबंधि विषयाच्या अनुषंगि संपूर्ण माहितीसह होणे आवश्यक आहे. अधिकार मंडळाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होण्यासाठी धीक्षकांनी सदैव दक्ष राहिले पाहिजे. कामकाजा गती येण्यासाठी कार्यालयामधील निरोगी वातावरणाची निर्मिती सुसंवादाने होईल. प्रत्येकास संगणकाचे अद्यावत ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यापीठाने कार्यान्वित केलेल्या मिटींग सॉफ्टवेअरची मागणी अनेक पातळीवरून होत आहे. कामकाजामध्ये विद्यार्थीकेंद्रि हिताची जपणूक प्राधान्याने केली पाहिजे.
एम.बी.ए. अधिविभागप्रमुख डॉ. एच.एम. ठकार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यापीठाचे अंतर्गत लेखापाल अजित चौगुले यांच्यासह विद्यापीठातील धीक्षक, सहाय्यक धीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment