Wednesday, 26 September 2018

राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत सहभागी संघाने

शिवाजी विद्यापीठाचा लौकिक उंचावला

- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे गौरवोद्गार


१४व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत विभागीय स्तरावर अव्वल कामगिरी बजावल्याबद्दल नवी दिल्ली येथे संसद भवनातील बालयोगी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या संघास ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले. ट्रॉफी स्वीकारताना समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचा संघ.


१४व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेतील विभागीय स्तरावरील विजेतेपदाची ट्रॉफी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना प्रदान करताना डॉ. प्रल्हाद माने व बेस्ट परफॉर्मन्स पुरस्कार विजेते विद्यार्थी.


कोल्हापूर, दि. २६ सप्टेंबर: राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत यंदा प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त करून संघातील विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाचा लौकिक उंचावला, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल येथे काढले. राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात प्रदान करण्यात आलेल्या ट्रॉफीसह संघाने कुलगुरू डॉ. शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी संघाचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे स्पर्धेतील एकूण चमकदार कामगिरीबद्दल कौतुक व अभिनंदन केले. या यशाचा विद्यार्थ्यांना भावी जीवनात निश्चितपणे सकारात्मक लाभ होईल. सार्वजनिक जीवनात वावरतानाही देशाचा लौकिक वाढेल, असे योगदान त्यांनी द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के उपस्थित होते.
१४व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत यंदा शिवाजी विद्यापीठाच्या संघाने दमदार कामगिरीच्या जोरावर प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत झेप घेतली. या संघाला विभागीय स्तरावर अव्वल दर्जाची कामगिरी बजावल्याबद्दल आणि या संघातील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांना बेस्ट परफॉर्मन्स प्राईझ विनर पुरस्कार जाहीर झाला होता. या १४व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच नवी दिल्ली येथील भारतीय संसद भवनाच्या बालयोगी सभागृहात पार पडला. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ झाला. या स्पर्धेत देशभरातून एकूण ७४ संघ सहभागी झाले. शिवाजी विद्यापीठाच्या संघाने पश्चिम विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत झेप घेतली होती. यावेळी विभागीय सांघिक पारितोषिकासह संघातील निकिता पिसे, अभिजीत ताम्हणकर, शैलेश चिले, श्रेयश मोहिते, विनायक साळुंखे, गौरी काटे, हेरंब सावंत व आकांक्षा पाटील या आठ विद्यार्थ्यांना बेस्ट परफॉर्मन्स पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांचे मार्गदर्शन लाभले.

Wednesday, 5 September 2018

महाविद्यालये ही विवेकी विचारांची संस्कार केंद्रे: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे


कुलगुरू डॉ.देवानंद शिंदेप्राचार्य डॉ.एस.वाय.होनगेकरकुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर,

डॉ. डी.आर.मोरे,  श्री.व्ही.टी.पाटील

कोल्हापूर, दि. सप्टेंबर - विवेकी विचारांची महाविद्यालये उत्तम प्रकारची संस्कारकेंद्रे आहेत. प्राचार्यांनी व्यापक दृष्टीने हे संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्यास महाविद्यालय, संस्थेप्रती विद्यार्थ्यां आदरभाव निर्माण होईल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभ आज विद्यापीठाच्या मानव्यविद्या सभागृहात झाला. त्यानिमित्त प्राचार्यांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते.
कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी, शिक्षणशास्त्र या पाच विद्याशाखांमधील सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील सर्वाधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या शहरी, निमशहरी ग्रामीण या गटातून सर्व प्रथम आलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रशस्तीपत्र दे सन्मानित करण्यात आले.  विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, वित्त लेखाधिकारी व्ही.टी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे
      कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, हा समारंभ म्हणजे महाविद्यालयांच्या यशाचे, प्रगतीचे आणि त्यांच्या क्षमतेचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीसाठी त्यांनी मिळविलेले यश महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांची दृष्टी बदलल्यास मानवतेचा विकास होण्यास सहाय्यभूत ठरते. स्पर्धेच्या जगा तोंड देण्यासाठी शिक्षण हे उत्तम प्रकारचे साधन आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या क्षमता वृद्धिंगत करीत राहायला हवे. त्याचबरोबर संशोधन, व्यवस्थापन आणि कौशल्ये आत्मसात करावीत.  आजच्या युगामध्ये इंटरनेट हे महत्वाचे विकासाचे साधन म्हणून पुढे येत आहे.  त्याचा शिक्षणासाठी योग्य वापर करणे गरजेचे आहे. 
      यावेळी पारितोषिक विजेत्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मनोगत व्यक्त केले.  कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.
                                         
                                      ------


Monday, 3 September 2018

तंत्रज्ञानापुरते सिमीत न राहता बुद्धीच्या कक्षा वाढवा: डॉ. सुभाष देसाई यांचे आवाहन

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. सुभाष देसाई. व्यासपीठावर डॉ. रविंद्र भणगे, डॉ. प्रकाश पवार.


कोल्हापूर, दि. सप्टेंबर: आजच्या तरुणांपुढे रोबोटिक व्हाने उभी ठाकली आहेत. त्यामुळे तरूणांनी स्वत:ला केवळ तंत्रज्ञानापुरते सिमीत न करता आपल्या बुद्धीच्या कक्षा वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र अधिविभागात आयोजित दत्ताबाळ स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत 'दत्ताबाळांचे जीवन कार्य' या विषयावर डॉ. देसाई बोलत होते. अर्थशास्त्र विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी अधिविभागप्रमुख डॉ.प्रकाश पवार होते. 
डॉ. देसाई म्हणाले, जीवना यशस्वी होण्यासाठी विचारांची पायाभरणी चांगली असली पाहिजे.  तरूण पिढीने धर्म आणि विज्ञान यांबाबत तौलनिक चर्चा केली पाहिजे. त्याचा त्यांना निश्चितच लाभ होईल. बॅ. बाळासाहेब खर्डेकर आणि प्राचार्य एम.आर. देसाई यांनी स्वातंत्र्यपूर्व काळा जवळ-जवळ पाचशे प्राथमिक शाळा काढल्या. प्राचार्य एम.आर. देसाई यांचे दत्ताबाळ हे द्वितीय चिरंजीव होते. शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव प्राचार्य देसाई यांच्यावर होता. तेच संस्कार दत्ताबाळांवर होते. सामाजिक चळवळींचा वसा त्यांनी त्यांच्यापासून घेतला. त्यानुसार वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांत ते सहभागी होत. निसर्गा, माणसां ईश्वर पाहण्यास शिका, ही दत्ताबाळांची शिकवण होती. 
डॉ. प्रकाश पवार अध्यक्षीय भाषणात म्हणाले, भारता दोनशे र्षांपूर्वी १८१८ साली मध्यमवर्गीयांमध्ये आधुनिकता उदयास येण्यास सुरूवात होत होती. त्यावेळेस, मी कोण आहे, असा प्रश्न भारतीयांनी स्वत:ला विचारण्यास सुरूवात केली. त्या द्धतीने आपण कोणत्याही टोकाला, निष्कर्षाला जाता नेमकेपणाने दत्ताबाळ यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.रविंद्र भणगे यांनी प्रास्ताविक केले, तर सचिन चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.