विशेष मेळावा: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
|
शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात नोंदणी अर्ज भरताना दिव्यांग विद्यार्थिनी. |
|
शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्यास उपस्थित असलेले दिव्यांग उमेदवार. |
|
शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित दिव्यांग मेळाव्यास उपस्थित उमेदवारांना मेळावा स्थळी आणण्यासाठी विद्यापीठाने विशेष वाहन व्यवस्था केली. |
|
शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित दिव्यांग मेळाव्यास उपस्थित उमेदवारांना मदतीसाठी तत्पर असलेले सुरक्षा रक्षक. |
|
शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्यास उपस्थित असलेले दिव्यांग उमेदवार. |
|
शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्यास उपस्थित असलेले दिव्यांग उमेदवार. |
|
शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्याच्या नोंदणीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी. |
|
शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्याअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांची मुलाखत घेताना विविध आस्थापनांचे अधिकारी. |
|
शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्याअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांची मुलाखत घेताना कंपनी अधिकारी. |
|
शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्याचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) महेश चव्हाण, डॉ. नमिता खोत, डॉ. जी.एस. राशिनकर, व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी, डॉ. ए.एम. गुरव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. पी.बी. बिलावर आदी. |
|
शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. नमिता खोत, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी, डॉ. ए.एम. गुरव. |
कोल्हापूर, दि. २८ जून: शिवाजी विद्यापीठाने सर्वसमावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या
उपक्रमांची देशपातळीवर ‘नॅब’सारख्या संघटनांनी
दखल घेऊन पुरस्कार देऊन गौरविले आहे. दिव्यांगांप्रती ही बांधिलकी जपताना
विद्यापीठाने केवळ त्यांच्यासाठी कौशल्य व रोजगार मेळावा आयोजित केला आहे. त्याला
मिळालेला प्रतिसाद पाहता या पुढील काळातही विद्यापीठ अशा प्रकारचे उपक्रम
दिव्यांगासाठी राबवेल, अशी ग्वाही प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे
दिली.
शिवाजी विद्यापीठाचे मध्यवर्ती रोजगार कक्ष,
कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, सर्वसमावेशी शिक्षण संसाधन केंद्र आणि युजीसी- दिव्यांग व्यक्तींसाठी योजना यांच्या
संयुक्त विद्यमाने उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
कौशल्य व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन प्र-कुलगुरू
डॉ. शिर्के यांच्या हस्ते आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कुलपती नियुक्त
व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटनानंतर
नोंदणीकृत दिव्यांग उमेदवारांशी संवाद साधताना प्र-कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. मेळाव्यासाठी
सुमारे तीनशे दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
डॉ. शिर्के म्हणाले, केवळ दिव्यांग
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र रोजगार व कौशल्य मेळावा आयोजित करणारे शिवाजी
विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ असावे. या माध्यमातून दिव्यांग
विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त सबलीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दिव्यांग
उमेदवारांना सन्मानाने रोजगार संधींची उपलब्धता, सर्वसमावेशकता आणि सबलीकरण या
त्रिसूत्रीच्या आधारावर प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
त्याखेरीज विविध जीवन कौशल्ये देऊन त्यांचे सक्षमीकरणही करण्यात येत आहे. रोजगार
कदाचित मिळाला नाही, तरी रोजगाराभिमुखता विकसित करण्यासाठी, आत्मविश्वास वृद्धिंगत
करण्यासाठी ही कौशल्ये निश्चितपणे उपयोगी ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त
केला.
या वेळी मेळाव्याचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी
प्रास्ताविक केले. डॉ. जी.एस. राशिनकर यांनी स्वागत केले तर बॅ. बाळासाहेब खर्डेकर
ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांनी आभार मानले. यावेळी
युजीसी-स्कीम फॉर पर्सन विथ डिसॅबिलीटीज योजनेच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई,
कौशल्य विकास अधिकारी महेश चव्हाण आदी उपस्थित होते.
दिव्यांग विद्यार्थ्यांची भर पावसातही
उपस्थिती
विद्यापीठाच्या या रोजगार व कौशल्य विकास
मेळाव्याला दिव्यांग विद्यार्थ्यांचा भर पावसातही लक्षणीय प्रतिसाद लाभला. सकाळी
दहा वाजल्यापासूनच दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मानव्यशास्त्र इमारतीमध्ये
रीघ लागली होती. त्यांना इमारतीकडे आणण्यासाठी विशेष वाहन व्यवस्थाही विद्यापीठाने
पुरविली. उमेदवारांच्या नोंदणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नोंदणीकृत
प्रत्येक उमेदवाराला मोफत चहा-नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. दिव्यांग
विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विशेष रॅम्प उभारण्यापासून आवश्यक सुविधांची उभारणीही
इमारतीमध्ये करण्यात आली. पायाने अधू विद्यार्थ्यांना व्हीलचेअरसह येता-जाता येईल,
अशी व्यवस्था तळमजल्यावर करण्यात आली होती. त्यांच्या मुलाखतीची व कौशल्य
प्रशिक्षणाची व्यवस्थाही तळमजल्यावरच करण्यात आली. इतर दिव्यांगांना पहिल्या
मजल्यावरील सभागृहात कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.
मेळाव्यात मूकबधीर, अंध, अस्थिव्यंग अशा २९६
दिव्यांग उमेदवारांनी नोंदणी केली. दिवसभरात शिवाजी विद्यापीठासह युरेका फोर्ब्ज,
स्कायलार्क ग्लोबल, डॉ. रेड्डीज फौंडेशन, एल.आय.सी. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आदी
आस्थापनांनी रोजगार भरतीसाठी नोंदणीकृत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
सहभागींना मुलाखत तंत्र, छायाचित्रण, आयसीटी
कौशल्ये, ग्रुप डिस्कशन, सकारात्मक विचार कौशल्ये, रिझ्युम लेखन, टॅक्स प्रॅक्टीस,
सेट-नेट व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध कौशल्यांबाबत डॉ. ए.एम. गुरव, डॉ.
के.व्ही. मारुलकर, डॉ. पी.एन. देवाळी, डॉ. जी.एस. राशिनकर, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ.
व्ही.एस. खंडागळे, प्रमोद कसबे, महेश चव्हाण आणि जयंत नागराळे यांनी मार्गदर्शन
केले.
No comments:
Post a Comment