Thursday, 8 September 2016

अंधत्वावर मात करीत 'सेट' उत्तीर्ण झालेल्या

अमित पाटणकर यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार


कोल्हापूर, दि. ८ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातील अंध विद्यार्थी अमित अनिल पाटणकर हे नुकत्याच घेण्यात आलेल्या 'सेट' परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. 
'सेट'सारख्या अत्यंत महत्त्वाच्या व अवघड परीक्षेत अमित यांनी मिळविलेले यश अत्यंत कौतुकास्पद असून केवळ अंधच नव्हे, तर सर्वच विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी काढले. त्यांच्या हस्ते शाल, ग्रंथ व विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे, डॉ. प्रतिमा पवार, डॉ. पी.बी. देसाई, डॉ. प्रल्हाद माने उपस्थित होते. 
श्री. पाटणकर हे सध्या समाजशास्त्र अधिविभागात डॉ. कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली 'कोल्हापूर शहरातील अंध विद्यार्थ्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास' या विषयावर एम.फील. करीत आहेत.

No comments:

Post a Comment