उपयोजित संख्याशास्त्र राष्ट्रीय परिषद शिवाजी विद्यापीठात उत्साहात
कोल्हापूर, दि. १५ मार्च: संख्याशास्त्र
विषयाचा उपयोग समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी होणे आवश्यक आहे, असे
प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा. आर.एन.
रट्टीहळ्ळी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागामार्फत उपयोजित संख्याशास्त्र (अप्लाईड स्टॅटिस्टिक्स) या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोलकता येथील आय.एस.आय. संस्थेचे प्रा. आशिष
सेनगुप्ता प्रमुख उपस्थित तर, अधिविभाग प्रमुख प्रा. डी.एन. काशीद अध्यक्षस्थानी
होते.
गणित विभागाच्या रामानुजन सभागृहात झालेल्या या
परिषदेस संबोधित करताना प्रा. रट्टीहळ्ळी म्हणाले, संख्याशास्त्र हा विषयच मुळात
सामाजिक उपयोजनाचा आहे. संख्याशास्त्रीय विश्लेषणाचे दूरगामी लाभ समाजाला होत
असतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ध्येयधोरणांची आखणी व निश्चिती
करण्याच्या कामी संख्याशास्त्राचे योगदान अमूल्य असते. त्यामुळे या विषयाचा अभ्यास
करताना अभ्यासकांनी त्याकडे एक सर्वंकष समाजोपयोगी शास्त्र या दृष्टीकोनातून
पाहण्याची गरज आहे. पीएच.डी.सारखे उच्चशिक्षण घेतल्यानंतरही या संशोधनाचा ओघ
संशोधकांनी थांबविता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
यावेळी डॉ. आशिष सेनगुप्ता यांनी ‘डिरेक्शनल स्टॅटिस्टिक्स फॉर बीग डेटा सायन्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. डी. टी. शिर्के यांनी एम. एस्सी. अप्लाईड स्टॅटिस्टिक्स हा यु.जी.सी च्या ईनोव्हेटिव्ह प्रोग्राम अंतर्गत अधिविभागात सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. डॉ. एस. बी. महाडिक यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एच. व्ही. कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ. डी.एम. सकटे यांनी सूत्रसंचालन केले.
परिषदेत आमंत्रित व्याख्याते डॉ. एस.व्ही. भट, प्रा. एस.बी. मुनोळी (कर्नाटक विद्यापीठ, धारवाड), प्रा. पी. व्ही. पंडीत (बेंगलोर विद्यापीठ, बेंगलोर), प्रा. टी.व्ही. रामनाथन (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) यांचे व्याख्यान झाले. विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील बारा संशोधकांनी शोधनिबंध सादर केले.
No comments:
Post a Comment