डॉ. अजय साळी यांचे स्वागत करताना डॉ. आर.आर. मुधोळकर. मध्यभागी डॉ. आर.के. कामत. |
विद्यापीठात पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट
प्रोग्रामचे उद्घाटन
डॉ. अजय साळी |
कोल्हापूर, दि.
५ जुलै: माहिती तंत्रज्ञानाच्या
सहाय्यानेच प्रशासकीय कारभारात झिरो पेन्डन्सीचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे,
असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी
काल येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा संगणकशास्त्र अधिविभाग आणि गुगल-इंडिया यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट
प्रोग्रामचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
डॉ. साळी
म्हणाले, प्रशासकीय
कारभार गतिमान व पारदर्शी होण्याच्या दृष्टीने माहिती तंत्रज्ञान प्रणाली अत्यंत
उपयुक्त ठरत आहे. मोबाईल अॅप्लीकेशन्स, संकेतस्थळे व ब्लॉगसारख्या माध्यमातून शिक्षण
क्षेत्राच्या समस्या सोडविण्यास यश प्राप्त झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून उच्चशिक्षण
सहसंचालक कार्यालयाच्या उत्तम सेवा या संकेतस्थळाकडे पाहता येईल. या
संकेतस्थळामुळे विभागाला झिरो पेन्डन्सीचे उद्दिष्ट साध्य करता आले.
विद्यापीठाच्या
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (आय.क्यू.ए.सी.) प्रमुख व इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागप्रमुख
डॉ. आर. के. कामत यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या
सोडविता येणे शक्य असल्याचे सांगितले. तसेच, तंत्रज्ञानाचा रचनात्मक व विधायक कार्यासाठी
वापर करण्याची गरज असल्याचेही सांगितले.
यावेळी संगणकशास्त्र
अधिविभाग प्रमुख डॉ. आर. आर. मुधोळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गुगल प्रायोजित
''एन्ड्रॉइड फंडामेन्टल
डेव्हलपमेंट'' या उपक्रमाची संकल्पना व महत्त्व स्पष्ट केले.
या फॅकल्टी
डेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्ये विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील व संलग्नित महाविद्यालयांतील
70 शिक्षक सहभागी झाले आहेत. त्यांना गुगलतर्फे ललीत सिंग, श्रेयांश
खन्ना व सिम्मी आनंद प्रशिक्षण देत आहेत.
कबीर
खराडे यांनी परिचय करून दिला. प्रोग्रॅम समन्वयक डॉ. के. एस. ओझा यांनी आभार
मानले. यावेळी डॉ. यु. आर. पोळ, डॉ. व्ही. एस्. कुंभार, प्रसाद
गोयल, परशुराम वडार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment