शिवाजी विद्यापीठात ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलीयन’ उपक्रमांतर्गत आयोजित फुटबॉल स्पर्धेचे फुटबॉलला कीक मारून उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. शेजारी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व इतर. |
फुटबॉल स्पर्धेत सहभागी संघांसमवेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड व अन्य शारीरिक शिक्षण संचालक. |
फुटबॉल स्पर्धेत सहभागी खेळाडूंसमवेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड व अन्य शारीरिक शिक्षण संचालक. |
कोल्हापूर, दि. १५
सप्टेंबर: महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलीयन’ या उपक्रमांतर्गत शिवाजी
विद्यापीठात आज आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद
लाभला. स्पर्धेत सहभागी झालेल्या चौदा संघांमध्ये विद्यार्थिनींच्याही चार संघांचा
समावेश राहिला, हे महत्त्वाचे!
आज सकाळी
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर,
राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि
क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिवसभरात विद्यापीठाच्या
क्रीडा मैदानावर या फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी
फुटबॉलला कीक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीही
स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
फेडरेशन ऑफ
इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) यांच्यातर्फे १७ वर्षांखालील खेळाडूंसाठी फुटबॉल
वर्ल्ड कप स्पर्धा दि. ६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत भारतात होत आहे.
स्पर्धेतील एकूण सामन्यांपैकी सहा सामने महाराष्ट्रात नवी मुंबई येथे होणार आहेत.
या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राज्यात फुटबॉलची आवड निर्माण व्हावी व अधिकाधिक
युवकांनी मैदानी खेळांसाठी प्रवृत्त व्हावे, यासाठी ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन १
मिलीयन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला विद्यापीठातील अधिविभाग व
महाविद्यालयांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. आजच्या स्पर्धेत विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र,
पर्यावरणशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, प्राणीशास्त्र, नॅनो सायन्स व तंत्रज्ञान,
तंत्रज्ञान अधिविभाग यांसह शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज, स.ब. खाडे महाविद्यालय,
कोपार्डे, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर, केआयटी इन्स्टिट्यूट ऑफ
इंजिनिअरिंग, कोल्हापूर या महाविद्यालयांचे एकूण चौदा संघ सहभागी झाले. त्यामध्ये
चार मुलींचे संघही सहभागी झाले.
स्पर्धा यशस्वी
होण्यासाठी जे.एच. इंगळे, डॉ. अभिजीत वणिरे, एन.आर. कांबळे, धनंजय पाटील, राहुल
मगदूम, विक्रम नांगरे, गॅब्रिएल रॉड्रिग्ज, शशी दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment