कोल्हापूर, दि.21 जून - नियमित योग साधनेतून सुर्य, हवा, पाणी आणि सभोवतालच्या निसर्गामधून उत्सर्जीत होणारी वैश्विक ऊर्जा प्राप्त होते. योगामुळे उत्साह, आनंद आणि सुखाची अनुभूती होते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी केले.
विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योगसाधना शिबिराचे आयोजन विद्यार्थी विकास, राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन व विस्तार कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना कुलगुरू शिर्के बोलत होते.याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ.शिर्के म्हणाले, आरोग्य
संवर्धनासाठी योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. मन व शरीर, विचार
व कृती, संयम
व निसर्ग यांच्यातील एेक्याला मूर्त रूप देतो.योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वत:शी, जगाशी
आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे.विद्यापीठामध्ये सलग दहा वर्षांपासून विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये मोफत योग शिबीर घेतले जात आहेे.
आज, शिवाजी
विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये सकाळी 7.20 ते 8.45 यावेळेत
योगसाधना शिबीर संपन्न झाले.कुलगुरू डॉ.शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.योगसाधना शिबिरात कुुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त
व लेखाधिकारी श्रीमती सुहासिनी पाटील, अधिष्ठाता
डॉ.सरिता ठकार, विद्यार्थी
विकासचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय
सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, क्रीडा
अधिविभागाचे संचालक डॉ.शरद बनसोडे, आजीवन
व विस्तार विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार सहभागी झाले.विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय सेवक यांच्यासह नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी झाले.योगशिक्षक सूरज पाटील यांनी उपस्थितांना योगसाधनेचे प्रशिक्षण दिले.
......
No comments:
Post a Comment