Showing posts with label Job Fair 2016. Show all posts
Showing posts with label Job Fair 2016. Show all posts

Sunday, 21 August 2016

विद्यापीठातील मेळाव्यातून १७० उमेदवारांना रोजगार उपलब्ध




कोल्हापूर, दि. २१ ऑगस्ट: कौशल्य विकास हा आजच्या युगातील यशस्वितेचा पासवर्ड असून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कौशल्यांचा योग्य पद्धतीने वापर व विकास केल्यास त्यांना उत्तम रोजगार संधीही प्राप्त होतील, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याच्या (जॉब फेअर) उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
दरम्यान, या जॉब फेअरमध्ये सॉफ्टवेअर, बँकिंग, वस्त्रोद्योग, वाहननिर्मिती, टेलिकॉम आदी विविध क्षेत्रांतील एकूण १३ कंपन्या सहभागी झाल्या. त्यांच्या माध्यमातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ४५० रोजगार संधी उपलब्ध होत्या. त्यासाठी सुमारे ५७८ उमेदवारांनी नावनोंदणी केली. त्यांच्यामधून एकूण १७० उमेदवारांची मेळाव्यात विविध पदांसाठी निवड करण्यात आली, अशी माहिती कक्षाचे समन्वयक डॉ. पी.एन. भोसले यांनी दिली.

Thursday, 19 May 2016

शिवाजी विद्यापीठ आयोजित रोजगार मेळाव्यास उत्तम प्रतिसाद





कोल्हापूर, दि.16 मे - शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती प्लेसमेंट कक्ष आणि आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागामध्ये जॉब फेअर - 2016 चे आयोजन करण्यात आले होते. सर्व शाखांच्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आयोजित रोजगार मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. विविध शाखांच्या दीड हजार विद्यार्थींनी मुलाखती दिल्या. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोल्हापूर शहरामध्येच रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली.
दरम्यान, रोजगार मेळाव्यास विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.देवानंद शिंदे, बीसीयुडीचे संचालक, डॉ.डी.आर. मोरे, प्र.कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी भेट देवून पहाणी केली. तसेच, कुलगुरु प्रा.डॉ.देवानंद शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
 
नेटक्या नियोजनामुळे रोजगार मेळाव्यामध्ये सर्वत्र उल्हासी वातावरण होते. या रोजगार मेळाव्यामध्ये 22 आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सॉफ्टवेअर, मार्केटिंग, नेटवर्कींग, वेब डिझायनिंग, डाटा एंट्री, ग्राफीक्स, एच आर, विक्री, सेवा इ. विविध क्षेत्रांमधील नोकरीची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली. मुलाखतीचा निकाल दोन दिवसात विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याची माहिती मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षाचे समन्वयक प्रा.पी.एन.भोसले यांनी दिली.