कोल्हापूर, दि. २१ ऑगस्ट: कौशल्य विकास हा
आजच्या युगातील यशस्वितेचा पासवर्ड असून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कौशल्यांचा
योग्य पद्धतीने वापर व विकास केल्यास त्यांना उत्तम रोजगार संधीही प्राप्त होतील,
असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल येथे व्यक्त
केला.
शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्लेसमेंट कक्षातर्फे आयोजित
करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याच्या (जॉब फेअर) उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
दरम्यान, या जॉब फेअरमध्ये सॉफ्टवेअर, बँकिंग, वस्त्रोद्योग,
वाहननिर्मिती, टेलिकॉम आदी विविध क्षेत्रांतील एकूण १३ कंपन्या सहभागी झाल्या.
त्यांच्या माध्यमातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ४५०
रोजगार संधी उपलब्ध होत्या. त्यासाठी सुमारे ५७८ उमेदवारांनी नावनोंदणी केली. त्यांच्यामधून
एकूण १७० उमेदवारांची मेळाव्यात विविध पदांसाठी निवड करण्यात आली, अशी माहिती कक्षाचे
समन्वयक डॉ. पी.एन. भोसले यांनी दिली.
No comments:
Post a Comment