कोल्हापूर, दि. ८ ऑगस्ट: शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज शिवाजी
विद्यापीठात त्यांच्या पुण्यस्मृतींना अभिवादन करण्यात आले. बीसीयुडी संचालक डॉ.
डी.आर. मोरे यांच्या हस्ते शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रांगणातील बापूजी
साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.
व्ही.एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.
आर.व्ही. गुरव, डॉ. डी.टी. शिर्के, शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रतिभा
पाटणकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. श्रीमती जी.एस. पाटील यांच्यासह संशोधक विद्यार्थी,
कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment