Thursday, 25 August 2016

शिवाजी विद्यापीठात अधिविभागांचे शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यांकन






कोल्हापूर, दि. २५ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी क्षाच्या (आय.क्यू.ए.सी.) माध्यमातून विद्यापीठाचे शैक्षणिक प्रशासकीय ल्यांकन बहिस्थ सहयोगी समितीतर्फे करण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांत राबविण्यात आली. सदरच्या समितीमध्ये उच्च शिक्षणामधील नामांकित शिक्षणज्ज्ञांचा समावेश असून उद्या (दि. २६) सकाळी ११.३० वाजता एक्झिट मिटींगमध्ये मूल्यांकन अहवाल विद्यापीठास सादर करण्यात येणार आहे.
शिवाजी विद्यापीठाने ३.१६ इतक्या सीजीपीए गुणांकनासह नॅकचे '' मानांकन प्राप्त करुन महाराष्ट्रा अव्वल स्थान प्राप्त केले. पुढील चौथ्या नॅक पुनर्मूल्यांकनास सामोरे जाण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये देशात २८वे आणि महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांत प्रथम स्थान मिळविल्यानंतर आता विद्यापीठाने शैक्षणिक प्रशासकीय गुणवत्ता आणखी सुधारण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. अंतर्गत गुणवत्ता हमी क्षाच्या माध्यमातून शैक्षणिक प्रशासकीय कामगिरीचे निरंतर अवलोकन केले जात आहे. याचाच भाग म्हणून विद्यापीठाचे शैक्षणिक प्रशासकीय मुल्यांकन बहिस्थ सहयोगी समितीतर्फे करण्याची प्रक्रिया दि. २४ ते २६ ऑगस्ट, २०१६ या कालावधीत करण्यात येत आहे. या समितीमध्ये जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. आर.एस. माळी, गुजरात केंद्रीय विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एस.एल. हिरेमठ, बेळगाच्या राणी चन्नमा विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. पी.व्ही. कोण्णूर, महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण विभागाचे माजी उपसचिव डॉ.अजित थेटे तसेच औरंगाबादचे प्राचार्य डॉ. एस.व्ही. बिराजदार यांचा समावेश आहे. या समितीला अंतर्गत सहयोगी सदस्य म्हणून विद्यापीठातील अधिविभागप्रमुख डॉ.पी.एन. भोसले, डॉ.एल.एन. काटकर, डॉ.राजन गवस डॉ.प्रकाश पवार यांची नियुक्ती केली आहे. सहाय्यक कुलसचिव डॉ. वैभव ढेरे, मधुकर पाटील धैर्यशील यादव प्रशासकीय नियोजन सांभाळत आहेत.
बुधवार, दि. २४ ऑगस्ट रोजी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी समितीचे स्वागत करुन समिती सदस्यांना मार्गदर्शन केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. आर.के. कामत यांनी मूल्यांकनाबाबतची पार्श्वभूमी वि केली. या बैठकीस प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांनी प्रशासकीय विभागांच्या योगदानाविषयी माहिती दिली.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत समितीने विविध अधिविभागांना भेट देऊन विविध विभागप्रमुखांचे सादरीकरण पाहिले. तसेच विभागांचे ल्यमापन करुन आवश्यक सुधारणांबाबत बहुमोल अशा चना विभागांना दिल्या. विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. यासंबंधीचा विस्तृत अहवाल उद्या (दि.२६) अधिविभागप्रमुख, शिक्षक प्रशासकीय सेवकांच्या बैठकीत बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment