कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट: लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांच्या हस्ते लोकशाहीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन
त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्रभारी वित्त
व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड,
विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक डॉ.एम.एल. जाधव, उपकुलसचिव डॉ.
गिरीश कुलकर्णी, डॉ. डी.व्ही. मुळे, डॉ. वासंती रासम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment