कोल्हापूर, दि. ९ ऑगस्ट: शिवाजी
विद्यापीठात आज ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त शहीद जवान, क्रांतीवीरांच्या पवित्र स्मृतींना मनःपूर्वक
अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ परिसरातील क्रांतीवनातील स्मारकास प्रभारी कुलगुरु डॉ.डी.आर. मोरे यांच्या हस्ते पुष्पचक्र व फुले वाहण्यात आली.
देशासाठी
बलिदान दिलेल्या
क्रांतीवीरांसाठी
कुसुमाग्रज लिखित 'अनामिका' या कवितेचे वाचन डॉ. भारती पाटील यांच्यासह उपस्थितांनी केले. पुढील वर्षी क्रांतीदिनास ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या
पार्श्वभूमीवर क्रांतीवनाचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे डॉ. मोरे यांनी यावेळी
सांगितले. आबा देशपांडे यांनी क्रांतीवनाच्या विकासासाठी गजेंद्र प्रतिष्ठान
सर्वोतोपरी सहकार्य करील, असे सांगितले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, वनस्पतीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. डी.के. गायकवाड, हिंदी अधिविभागप्रमुख डॉ. पद्मा पाटील, डॉ. एस.एस. कांबळे, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह
अधिकारी, कर्मचारी,
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment