Showing posts with label Kranti Din. Show all posts
Showing posts with label Kranti Din. Show all posts

Wednesday, 9 August 2017

शिवाजी विद्यापीठात क्रांतीवीरांना अभिवादन;

रक्तदान अभियानांतर्गत ८० जणांकडून रक्तदान



क्रांतीदिनानिमित्त विद्यापीठातील क्रांतीवनातील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र वाहून अभिवादन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. शेजारी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. डी.के. गायकवाड, उपकुलसचिव विलास सोयम आदी.


रक्तदान क्रांती महाअभियानाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कोल्हापूर, दि. ऑगस्ट: देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीदांना आज क्रांतीदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे या निमित्त विद्यार्थी कल्याण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान क्रांती महाअभियानात ८० जणांनी रक्तदान केले.
आज सकाळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठाच्या गेट क्रमांक आठ येथील क्रांतीवनामधील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, अधिष्ठाता डॉ.भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, आयक्यूएसीचे संचालक डॉ. आर.के. कामत, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. एम.ए. अनुसे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आज विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, अर्थशास्त्र अधिविभाग आरोग्य केंद्र तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर आणि मंथन फौंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लोककला केंद्रामध्ये रक्तदान क्रांती महाअभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत ८० जणांनी रक्तदान केले. प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुप्रिया लोखंडे, एस.पी. पंचगल्ले दींसह अकरा जणांच्या पथकाने रक्तसंकलनाचे काम केले.

Tuesday, 9 August 2016

शिवाजी विद्यापीठात क्रांतिवीरांना अभिवादन





कोल्हापूर, दि. ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात आज ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त शहीद जवान, क्रांतीवीरांच्या पवित्र स्मृतींना मनःपूर्वक अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ परिसरातील क्रांतीवनातील स्मारकास प्रभारी कुलगुरु डॉ.डी.आर. मोरे यांच्या हस्ते पुष्पचक्र फुले वाहण्यात आली.
देशासाठी  बलिदान  दिलेल्या  क्रांतीवीरांसाठी  कुसुमाग्रज लिखित 'अनामिका'   या कवितेचे वाचन डॉ. भारती पाटील यांच्यासह उपस्थितांनी केले. पुढील वर्षी क्रांतीदिनास ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर क्रांतीवनाचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे डॉ. मोरे यांनी यावेळी सांगितले. आबा देशपांडे यांनी क्रांतीवनाच्या विकासासाठी गजेंद्र प्रतिष्ठान सर्वोतोपरी सहकार्य करील, असे सांगितले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, प्रभारी वित्त लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, वनस्पतीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. डी.के. गायकवाड, हिंदी अधिविभागप्रमुख डॉ. पद्मा पाटील, डॉ. एस.एस. कांबळे, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.