Wednesday 9 August 2017

शिवाजी विद्यापीठात क्रांतीवीरांना अभिवादन;

रक्तदान अभियानांतर्गत ८० जणांकडून रक्तदान



क्रांतीदिनानिमित्त विद्यापीठातील क्रांतीवनातील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र वाहून अभिवादन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. शेजारी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. डी.के. गायकवाड, उपकुलसचिव विलास सोयम आदी.


रक्तदान क्रांती महाअभियानाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कोल्हापूर, दि. ऑगस्ट: देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीदांना आज क्रांतीदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे या निमित्त विद्यार्थी कल्याण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान क्रांती महाअभियानात ८० जणांनी रक्तदान केले.
आज सकाळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठाच्या गेट क्रमांक आठ येथील क्रांतीवनामधील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, अधिष्ठाता डॉ.भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, आयक्यूएसीचे संचालक डॉ. आर.के. कामत, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. एम.ए. अनुसे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आज विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, अर्थशास्त्र अधिविभाग आरोग्य केंद्र तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर आणि मंथन फौंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लोककला केंद्रामध्ये रक्तदान क्रांती महाअभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत ८० जणांनी रक्तदान केले. प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुप्रिया लोखंडे, एस.पी. पंचगल्ले दींसह अकरा जणांच्या पथकाने रक्तसंकलनाचे काम केले.

No comments:

Post a Comment