|
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह अन्य अधिकारी व मान्यवर. |
|
बसस्थानक परिसरातप्लास्टीक कचरा वेचताना प्र-कुलगुरू डॉ. शिर्के अ अन्य स्वयंसेवक |
|
बसस्थानक परिसरातप्लास्टीक कचरा वेचताना प्र-कुलगुरू डॉ. शिर्के अ अन्य स्वयंसेवक |
|
रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. |
|
रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. |
|
रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. |
|
शहरातील पुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. |
|
बिंदू चौक येथील स्वच्छतेनंतर महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना मान्यवर. |
|
बिंदू चौक येथील स्वच्छतेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना मान्यवर. |
|
शिवाजी चौकातील स्वच्छतेनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना मान्यवर व विद्यार्थी. |
|
दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना मान्यवर. |
|
गांधी मैदान येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना मान्यवर. |
|
बसस्थानक परिसरात सकाळी सकाळी जमलेल्या विद्यार्थ्यांना पाहून तेथून जाणाऱ्या प्रवासी महिलांनी विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियानाविषयी मनापासून जाणून घेतले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. |
शहरातील पुतळ्यांसह २८ ठिकाणांची साफसफाई; सुमारे
१६० किलो प्लास्टीक वेचले
कोल्हापूर, दि. ९ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाने शहर स्वच्छतेप्रती आपली बांधिलकी
जोपासताना क्रांतीदिनानिमित्त शहरातील विविध पुतळ्यांच्या परिसरासह मध्यवर्ती
बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात आज व्यापक स्वच्छता मोहीम राबविली. विद्यापीठ
तसेच महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन.एस.एस.) माध्यमातून सकाळी ८ ते
११ या कालावधीत रोटरी क्लब ऑफ करवीर, रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोल्हापूर
महानगरपालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात एक हजारांहून अधिक एनएसएसचे स्वयंसेवक सहभागी झाले. या मोहिमेअंतर्गत प्लास्टीक कचरा संकलनावर भर देण्यात
आला. घनकचरा, काचसामान या व्यतिरिक्त शहरातून सुमारे १६० किलो प्लास्टीक कचरा वेचण्यात
आला.
आज सकाळी ८ वाजता मध्यवर्ती
बसस्थानक परिसरापासून या स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली. या ठिकाणी
जमलेल्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी संबोधित करून प्र-कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के यांनी या मोहिमेस प्रारंभ केला. 'शिवाजी
विद्यापीठातर्फे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ
कोल्हापूरसाठी सातत्यपूर्ण मोहिमा राबविण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणे,
राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमा यांच्या स्वच्छतेबरोबरच मनाच्या स्वच्छतेचाही संस्कार
या मोहिमेच्या माध्यमातून रुजविला जाण्याची गरज आहे,' असे मत डॉ. शिर्के यांनी यावेळी केले.
बसस्थानक परिसरासह रेल्वे
स्थानक परिसरात डॉ. शिर्के यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व
लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय
सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी विद्यार्थ्यांसमवेत
स्वच्छता करण्यात पुढाकार घेतला. यावेळी स्वच्छतेनंतर प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह
सर्व अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व पुतळ्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना
एनएसएस विभाग आणि रोटरी क्लबतर्फे पुनर्प्रक्रियेसाठी प्लास्टीक गोळा करण्यास
स्वतंत्र थैल्या, हातमोजे, मास्क उपलब्ध करून देण्यात आले. या मोहिमेत कोल्हापूर
बसस्थानकाचे आगारप्रमुख सुनील शिंदे, वाहतूक नियंत्रक आर.बी. मोगे, विजय फाळके,
रोटरी क्लबचे एस.एन. पाटील, विशाळ जांबळे, प्रमोद चौगुले, ज्ञानदेव केसरकर, हरेष
पटेल, कुशल पटेल, मनोज कोळेकर, शीतल दुग्गे, किरण खटावकर, काशीनाथ सांगावकर
यांच्यासह शहरातील विविध महाविद्यालयांचे एन.एस.एस.चे समन्वयक यांनी हे महास्वच्छता
अभियान यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
स्वच्छता करण्यात
आलेले पुतळे आणि त्यांची स्वच्छता करणाऱ्या महाविद्यालयांची नावे अशी: बिंदू चौक, शिवाजी चौक- देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज
ऑफ कॉमर्स आणि नाईट कॉलेज, कोल्हापूर, पै. खाशाबा जाधव (भवानी मंडप, महालक्ष्मी
मंदिर) व संत गाडगेबाबा (ज्योतिबा रोड)- डॉ.डी. शिंदे सरकार महाविद्यालय, राजमाता
जिजाऊ (गंगावेस) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कोल्हापूर महानगरपालिका)- यशवंतराव
चव्हाण के.एम.सी. महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार (राजारामपुरी) व
रेल्वे स्टेशन- कमला महाविद्यालय, छत्रपती शाहू महाराज (दसरा चौक) व छत्रपती
राजाराम महाराज (व्हीनस कॉर्नर), आईसाहेबांचा पुतळा (अयोध्या टॉकीजजवळ) व मा.
श्रीपतराव बोंद्रे (गोकुळ हॉटेल) - श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, बसस्थानक, ताराराणी
पुतळा (कावळा नाका), राजीव गांधी (वटेश्वर मंदिराजवळ)- राजर्षी छत्रपती शाहू
महाविद्यालय, आईचा पुतळा (माऊली चौक)- राजाराम महाविद्यालय, जी.कांबळे (हुतात्मा पार्क) – गोखले महाविद्यालय, महात्मा गांधी (गांधी मैदान) व शिवाजी महाराज अर्धपुतळा- न्यू कॉलेज, न्यू पॅलेस (महावीर गार्डन), जिल्हाधिकारी कार्यालय- महावीर
महाविद्यालय. जिल्हा परिषद परिसर, आरटीओ कार्यालय व इरिगेशन चौक परिसर- विवेकानंद
महाविद्यालय, शाहू महाराज जन्मस्थळ, बावडा परिसर, सेंट्रल बिल्डींग परिसर- डी.वाय.
पटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कसबा बावडा, आर.के. नगर, गणपती मंदिर परिसर- भारती
विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी एन्ड इंजिनिअरिंग, राष्ट्रीय रस्ते महामार्ग, शाहू
नाका, उड्डाणपूल- केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणेरी मठ परिसर- धनंजय महाडिक
ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, विकासवाडी, कागल. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठातील छत्रपती
शिवाजी महाराज, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे, डॉ.आप्पासाहेब पवार, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यांची विद्यापीठ अधिविभागांमार्फत स्वच्छता
करण्यात आली.
No comments:
Post a Comment