Wednesday, 16 August 2017

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात







कोल्हापूर, दि.१५ ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्याचा ७० वा वर्धापनदिन शिवाजी विद्यापीठात आज मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. नुतन प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते आज सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ.डी.के.गायकवाड, अधिष्ठाता डॉ.भारती पाटील, डॉ.ए.एम.गुरव, डॉ.पी.डी.राऊत, डॉ.पी.एस.पाटील, क्रीडा अधिविभाग प्रमुख पी.टी.गायकवाड यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.

ध्वजवंदनानंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये गांधी अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित प्रत्यय निर्मीत महादेवभाई हे नाटय अभिवाचन डॉ.शरद भुथाडिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत करण्यात आलेे. यावेळी मोठया संख्येत उपस्थित शिक्षक, प्रशासकीय सेवक विद्यार्थी-विद्यार्थींनींनी त्यांच्या सादरीकरणास उत्स्फुर्तपणे दाद दिली.

------



No comments:

Post a Comment