सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. सुनीलकुमार सिंग. मध्यभागी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. |
सामंजस्य कराराची देवाणघेवाण करताना कुलगुरू डॉ. शिंदे व डॉ. सिंग. |
कोल्हापूर, दि. ११ ऑगस्ट: समुद्रविज्ञान संशोधनाच्या अनुषंगाने शिवाजी
विद्यापीठाचा गोव्याच्या भारतीय समुद्रविज्ञान संस्थेसमवेत (एनआयओ) सामंजस्य करार
करण्यात आला.
विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एनआयओच्या कार्यालयात गेल्या
मंगळवारी (दि. ८) हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे दोन्ही संस्थांमधील संशोधक विद्यार्थी व वैज्ञानिक यांना भविष्यात समुद्रविज्ञानाशी
निगडित महत्वाच्या विषयांवर संशोधन कार्य करण्याची संधी उपलब्ध होणार
असल्याचे मत कुलगुरु डॉ. शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी एनआयओचे संचालक डॉ.सुनिलकुमार सिंग आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, प्राणीशास्त्र अधिविभागाचे डॉ. डी.व्ही. मुळे, रसायनशास्त्र विभागाचे डॉ. पी.व्ही. अनभुले तसेच राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे डॉ.रणधीर मुखोपाध्याय, डॉ.बबन इंगोले, डॉ.रमेश कुमार, डॉ.सोनिया सुकुमारन व डॉ.मंदार नान्नजकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment