Tuesday 22 August 2017

प्रतीसरकारमुळे ग्रामीण समुदायावरील अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद - डॉ. अरुण भोसले यांचे प्रतिपादन


Dr. Arun Bhosale


कोल्हापूर, दि.22 ऑगस्ट: सर्वसामान्य ग्रामीण नागरिकांवरील अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करण्याचे कार्य प्रतीसरकारने केले, असे प्रतिपादन प्रा.डॉ.अरुण भोसले यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि जी.डी.बापू लाड प्रतिष्ठान, कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने मानव्यशास्त्र इमारतीच्या सभागृहामध्ये आयोजित जी.डी.बापू लाड आत्मकथन : एक संघर्ष यात्रा या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. क्रांती उद्योग आणि शिक्षण समुहाचे प्रमुख अरुणआण्णा लाड अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. अरुण भोसले म्हणाले, कर्जमुक्त करणे, अन्याय, अत्याचार आणि भय नाहीसा करणे म्हणजे स्वातंत्र्य ही जी.डी. बापूंची भूमिका सामान्य माणसाला भावली होती. साताऱ्याचे प्रतीसरकार हा एक गौरवशाली अध्याय होता. याचे सूत्रसंचालक जी.डी.बापू लाड होते. कुपरशाही गुंड टोळ्यां निपटारा करण्याचे काम प्रतीसरकारने केल्यामुळे जनतेचा विश्वास दृढ होत गेला. प्रतीसरकारच्या कार्यामधून समाधानाची भावना निर्माण झाली. मुतालीक सरदार जमिनीचे कब्जेदार होते. त्यांच्याकडून जमिनीचे फेरवाटप करुन भूमीपिडीतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तसेच, न्यायनिवाड्यासाठी क्रांतीकारी पंचायतीची स्थापना केली. प्रतीसरकारची एक खडी फौज असली पाहिजे, यासाठी त्यांनी कुंडलमध्ये प्रशिक्षण दे तुफान दल तयार केले. सातारा जिल्ह्यातील तरुण पिढी, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात तुफान दलामध्ये सामील होत गेले. स्वातंत्र्य ढ्यामध्ये महात्मा गांधींनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशी परिवर्तनाची जोड दिली. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ व्यापक होत गेली. १९४२ साली सुरु झालेली छोडो भारत आंदोलन म्हणजे दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती. १९४२ ते १९४५ या काळामध्ये ही चळवळ सुरु झाली.

ते पुढे म्हणाले, भारता चार-पाच ठिकाणी प्रतीसरकारांची स्थापना झाली. त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील सातारा होते. पश्चिम बंगालमधील मिदनापू येथील प्रतीसरकार दीड वर्षे टिकले. तर सातारा येथील प्रतीसरकार तब्बल ४४ महिने कार्यरत होते. जी.डी. बापू लाड यांना क्रांतीसिंह नाना पाटील यांचे मानसपुत्र म्हणता येईल. दोघांच्याही विचारांची नाळ घट्ट होती. तुफान सेनेचे फिल्ड मार्शल म्हणून जी.डी.बापू लाड यांनी काम केले. बहुसंख्य खेडेगांवांमध्ये क्य प्रस्थापित करण्याचे काम बापूंनी केले. यामुळे गावामध्ये क्य स्थापन करणे हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला. 

कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर म्हणाले, जी.डी.बापू लाड जसे परखड होते, तसे प्रांजळही होते. सामान्य शेतकरी कुटुंबातील जी.डी.बापू यांनी केलेले कार्य आजच्या डिजीटल युगामधील तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. 

Dr. Vilas Nandvadekar felicitating Shri. ArunAnna Lad at the workshop.
अध्यक्षीय भाषणात अरुणआण्णा लाड म्हणाले, १९४२ ची छोडो भारत ही चळवळ इस्लामपूर आणि तासगांव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली. या काळात जी.डी. बापूंनी स्वातंत्र्य ढ्यासाठी तुफान सैनिकांची शाळा उभी केली. सर्वसामान्य लोकांना समाजकंटकांचा त्रास होत होता. या समाजकंटकांना धडा शिकविण्याचे कार्य बापू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. त्यामुळे जनता सुखावून गेली. त्यांनी तरुणांसाठी उद्योगधंदे निर्माण करण्याचे कार्य केले. समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, उद्योग व्यवसायासाठी त्यांनी केलेले कार्य फार मोलाचे आहे. 

यावेळी प्रा.डॉ.अशोक चौसाळकर, प्रसाद कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अधिष्ठाता डॉ.भारती पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रा.केशव हरेल यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment