Saturday, 18 June 2016

कर्मचाऱ्यांच्या दातृत्वातून मिळालेल्या १५१ रोपांची कुलगुरूंच्या वर्षपूर्तीनिमित्त लागवड





कोल्हापूर, दि. १८ जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पदभार स्वीकारून वर्षपूर्ती झाल्याप्रित्यर्थ आज शिवाजी विद्यापीठात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यापीठाच्या उद्यान विभागाचे निवृत्त हेडमाळी अर्जुन मिठारी यांनी भेट दिलेली १०१ आंबा कलमे आणि कंत्राटदार बाळासो कांबळे (वाकरेकर) यांनी दिलेली ५० चिकूची रोपे अशी एकूण १५१ रोपे आज भूगोल अधिविभागाच्या शेजारील परिसरात लावण्यात आली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी गतवर्षी १८ जून रोजी कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यास काल वर्ष पूर्ण झाले. आज दुसऱ्या वर्षाची सुरवात त्यांनी वृक्षारोपणाने केली. उद्यान विभागाचे हेडमाळी अर्जुन मिठारी हे ३१ मे रोजी निवृत्त झाले. त्यावेळी त्यांनी विद्यापीठास १०१ आंबा रोपे दिली होती. त्याचप्रमाणे उद्यान विभागाचे कंत्राटदार बाळासो कांबळे (वाकरेकर) यांनीही ५० चिकू रोपे दिली होती. या दोघांनी दिलेली रोपे आजच्या दिवसाचे औचित्य साधून कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते लावण्यात आली. भूगोल अधिविभागाशेजारील जुन्या आंबा बागेचे उद्यान विभागातर्फे पुनरुज्जीवन करण्यात आले असून त्या जागेवर ही सर्व रोपे लावण्यात आली.
यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. जी.एस. कुलकर्णी, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. संभाजी शिंदे, डॉ.सचिन पन्हाळकर, उद्यान विभाग अधीक्षक ए.के. जाधव, सीए नीलेश भालकर, आर्किटेक्ट सुधीर राऊत व श्री. नाईक आदींच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.

No comments:

Post a Comment