Wednesday, 22 June 2016

कोल्हापूर महानगरपालिकेला विद्यापीठाकडून एक हजार रोपे




कोल्हापूर, दि. २२ जून: शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागामार्फत कोल्हापूर महानगरपालिकेस एक हजार झाडांची रोपे लागवड करण्यासाठी देण्यात आली. अधिविभाग प्रमुख डॉ. डी.के. गायकवाड यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे ही रोपे सुपूर्द केली.
विद्यापीठातर्फे देण्यात आलेल्या या रोपांत नारळ, पाम, फणस, घाणेरा, नरक्या, बकुळी, काश्मिरी बदाम, सीता अशोक यांसह विविध 26 प्रकारची एक हजार रोपे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने मुकादम बाजीराव कांबळे यांनी स्विकारली. यावेळी डॉ.एस.आर. यादव, डॉ.एस.एस. कांबळे, डॉ.एन.बी. गायकवाड, डॉ.एन.एस. चव्हाण, डॉ. आर.व्ही. गुरव आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment