|
चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष योग शिबिराचे रोपास पाणी घालून उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह मान्यवर. |
|
योग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. |
|
योग शिबिराविषयी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक विजय जाधव. |
|
योग शिबिरात सहभागी झालेल्या अनिता शिंदे यांच्यासह अरुंधती महाडिक, रेखा सारडा आदी |
|
योग साधक |
|
योग साधक |
संलग्न महाविद्यालयांतून ३० हजार जणांचा सहभाग
कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठ, श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ (कणेरी) आणि दै. महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आज सकाळी चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन योग
साधकांच्या उत्साही प्रतिसादामध्ये साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या लोककला
केंद्रात झालेल्या या उपक्रमात सुमारे ११०० योग साधक सहभागी झाले. यामध्ये शालेय
विद्यार्थ्यांपासून ते शिक्षक, अधिकारी, महिला यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचाही
लक्षणीय सहभाग होता. येथील भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनीही या
उपक्रमात सहभाग नोंदविला. संलग्नित महाविद्यालयांतून झालेल्या योग शिबिरांत सुमारे
३० हजार साधकांनी सहभाग नोंदविला.
संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार २१ जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज शिवाजी विद्यापीठात सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत पार पडला. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून 'योगशक्ती - योगयज्ञ'अंतर्गत योग प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठात सलग तीन
वर्षे राबविण्यात येत आहे. या योग उपक्रमाचा दैनंदिन
२००हून अधिक साधक लाभ घेतात. त्याची यंदा यशस्वीरित्या त्रिवर्षपूर्ती झाली.
या वेळी प्र-कुलगुरू
डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जगभरातील नागरिकांत
योगसाधनेविषयी जागृती निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांना दैनंदिन
स्वरुपात योगसाधना करण्यास प्रवृत्त करण्यात शिवाजी विद्यापीठ यशस्वी झाले आहे,
याचे समाधान वाटते.
यावेळी महाराष्ट्र
टाइम्सचे संपादक विजय जाधव म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या उपक्रमातून शिवाजी
विद्यापीठ आणि दै. महाराष्ट्र टाइम्सने कोल्हापूरच्या नागरिकांशी आरोग्याचे नाते
निर्माण केले असून हे सहसंबंध अधिक दृढ झाले आहेत.
यावेळी कणेरी
मठाच्या योग प्रशिक्षकांनी सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके साधकांकडून
करवून घेतली. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून
उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी.
पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.
डी.के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे
संपादक विजय जाधव, मुख्य वार्ताहर गुरूबाळ माळी, सौ. अनिता शिंदे, भागीरथी महिला
संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, रेखा सारडा यांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठाच्या विविध
विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक उपस्थित होते.
संलग्न महाविद्यालयांतील
शिबिरांत सुमारे ३० हजार जणांचा सहभाग
चौथ्या
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाने संलग्नित
महाविद्यालयांमधूनही योग शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानुसार संलग्नित महाविद्यालयांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपापल्या
आवारात योग शिबिरांचे नियोजन केले. या शिबिरांमध्ये सुमारे ३० हजार योग साधकांनी
आपला सहभाग नोंदविला, अशी माहिती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक
डॉ. डी.के. गायकवाड यांनी दिली.