Tuesday, 5 June 2018

पर्यावरण दिनानिमित्त विद्यापीठात वृक्षारोपण

शिवाजी विद्यापीठ परिसरात बालकांसमवेत वृक्षारोपण करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

शिवाजी विद्यापीठ परिसरात बालकांसमवेत वृक्षारोपण करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


कोल्हापूर, दि. जून: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ परिसरात आज कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे काही सेवाभावी संस्थांतर्फे विद्यापीठास विविध प्रकारची रोपेही भेट देण्यात आली.
आज सकाळी दूरशिक्षण विभागाच्या परिसरात कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह आंतरविद्याशाखा अधिष्ठाता व पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी.डी. राऊत, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, उद्यान विभागाचे अधीक्षक ए.के. जाधव यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरातील काही बालकेही उपस्थित होती. त्यांना सोबत घेऊनच कुलगुरूंनी वृक्षारोपण केले.

'कडुलिंब ऑक्सीजन पार्कचा मानस'
त्यानंतर देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्टस् अँड सायन्स कॉलेज, यशवंतनगर (चिखली), राजाराम बापू शुगर टेक्नॉलॉजी कॉलेज, इस्लामपूर, लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर आणि इस्लामपूर तसेच इफको कंपनी यांच्याकडून शिवाजी विद्यापीठास डुलिंबाची १०० रोपे  प्रदान करण्यात आली. प्राचार्य डॉ.एस.आर.पाटील यांच्यासह बाबासाहेब पवार, उमेश पवार, व्ही.आर. कलेडोणकर दींनी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्याकडे ही रोपे सुपूर्द केली. शिवाजी विद्यापीठा पर्यावरणपूरक डुलिंबाचा इको-झोन क्सिज पार्क निर्माण करण्याच्या दृष्टीने जीकच्या काळा याच संस्थांकडून विद्यापीठास कडुलिंबाची दहा हजार रोपे लागवडीसाठी देण्याचा मानस असल्याचेही यावेळी प्राचार्य डॉ.पाटील यांनी यावेळी सांगितले.

 तंत्रज्ञान अधिविभाग
दरम्यान, विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाच्या परिसरात कोल्हापूर वन विभागाच्या सहकार्याने शंभर रोपे लावण्यात आली. यावेळी उप-वनसंरक्षक सोनल कोंडुसकर, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच वन विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.

No comments:

Post a Comment