Showing posts with label International Yoga Day. Show all posts
Showing posts with label International Yoga Day. Show all posts

Monday, 21 June 2021

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

ऑनलाईन प्रात्यक्षिकांत ११०० नागरिकांचा सहभाग

 

शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन योग प्रात्यक्षिकांत सहभागी झालेले कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन योग प्रात्यक्षिकांत सहभागी झालेले प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील

शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन योग प्रात्यक्षिकांत सहभागी झालेले कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर





आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ऑनलाईन योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभागींना योग प्रात्यक्षिके दाखविताना योग प्रशिक्षक सूरज पाटील आणि त्यांनी सादर केलेले विविध योग प्रकार




कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठातर्फे आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या योग प्रात्यक्षिकांना साधकांचा उत्साही प्रतिसाद लाभला. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह सुमारे ११०० जणांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली आणि योग सराव केला.

शिवाजी विद्यापीठातर्फे दि. २१ जून २०१५पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन विद्यापीठ परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शेकडो नागरिकांचा या योग प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. त्याचप्रमाणे सन २०१५पासून आजतागायत योग सराव व प्रशिक्षणाचा कार्यक्रम विद्यापीठाने दैनंदिन स्वरुपात विनामूल्य पद्धतीने चालविला आहे. त्याचा नागरिक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर सदरची योग प्रात्यक्षिके ऑनलाईन स्वरुपात आयोजित केली जातात.

यंदाही कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज सकाळी ७ वाजता योग प्रशिक्षक सूरज पाटील यांनी विद्यापीठाच्या शिव-वार्ता युट्यूब वाहिनीवरुन योग साधकांना एक तास योग प्रात्यक्षिके दाखविली व अतिशय सोप्या पद्धतीने त्यांचे महत्त्व समजावून सांगितले. या ऑनलाईन प्रात्यक्षिकांचा लाभ सुमारे ११०० योग साधकांनी घेतला.

या ऑनलाईन प्रात्यक्षिकांमध्ये शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, विविध अधिकार मंडळांचे सदस्य यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, संस्थाचालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. या सर्व सहभागींचे कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी अभिनंदन केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

दरम्यान, विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ऑनलाईन स्वरुपात योग मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले. यामध्ये ४९ जण सहभागी झाले. योग प्रशिक्षक श्वेतलीना पाटील यांनी आनंददायी जीवनासाठी योग या विषयावर मार्गदर्शन केले; तसेच वेगवेगळ्या योग प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करून माहिती दिली. डॉ.  ए.एम. गुरव यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. अतुल एतावडेकर यांनी आभार मानले.

Thursday, 21 June 2018

विद्यापीठातील योग शिबिरात ११०० साधकांचा सहभाग

चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष योग शिबिराचे रोपास पाणी घालून उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह मान्यवर.

योग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

योग शिबिराविषयी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक विजय जाधव.
योग शिबिरात सहभागी झालेल्या अनिता शिंदे यांच्यासह अरुंधती महाडिक, रेखा सारडा आदी

योग साधक








योग साधक


संलग्न महाविद्यालयांतून ३० हजार जणांचा सहभाग
कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठ, श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ (कणेरी) आणि दै. महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आज सकाळी चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन योग साधकांच्या उत्साही प्रतिसादामध्ये साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झालेल्या या उपक्रमात सुमारे ११०० योग साधक सहभागी झाले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते शिक्षक, अधिकारी, महिला यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचाही लक्षणीय सहभाग होता. येथील भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला. संलग्नित महाविद्यालयांतून झालेल्या योग शिबिरांत सुमारे ३० हजार साधकांनी सहभाग नोंदविला.
संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार २१ जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज शिवाजी विद्यापीठात सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत पार पडला. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून 'योगशक्ती - योगयज्ञ'अंतर्गत योग प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठात सलग तीन वर्षे राबविण्यात येत आहे. या योग उपक्रमाचा दैनंदिन २००हून अधिक साधक लाभ घेतात. त्याची यंदा यशस्वीरित्या त्रिवर्षपूर्ती झाली.
या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जगभरातील नागरिकांत योगसाधनेविषयी जागृती निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांना दैनंदिन स्वरुपात योगसाधना करण्यास प्रवृत्त करण्यात शिवाजी विद्यापीठ यशस्वी झाले आहे, याचे समाधान वाटते.
यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक विजय जाधव म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या उपक्रमातून शिवाजी विद्यापीठ आणि दै. महाराष्ट्र टाइम्सने कोल्हापूरच्या नागरिकांशी आरोग्याचे नाते निर्माण केले असून हे सहसंबंध अधिक दृढ झाले आहेत.
यावेळी कणेरी मठाच्या योग प्रशिक्षकांनी सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके साधकांकडून करवून घेतली. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक विजय जाधव, मुख्य वार्ताहर गुरूबाळ माळी, सौ. अनिता शिंदे, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, रेखा सारडा यांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी सेवक उपस्थित होते.

संलग्न महाविद्यालयांतील शिबिरांत सुमारे ३० हजार जणांचा सहभाग
चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांमधूनही योग शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार संलग्नित महाविद्यालयांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपापल्या आवारात योग शिबिरांचे नियोजन केले. या शिबिरांमध्ये सुमारे ३० हजार योग साधकांनी आपला सहभाग नोंदविला, अशी माहिती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी दिली.


Tuesday, 21 June 2016

विद्यापीठाच्या योग शिबिराची वर्षपूर्ती उत्साहात; ३४०० साधकांचा सहभाग


















मोफत योग शिबीर पुढील वर्षभर राबविण्याची कुलगुरूंची घोषणा

कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ, कणेरी यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लोककला सभागृहात गेले वर्षभर सुरू असलेल्या मोफत योग शिबीराचा वर्षपूर्ती समारंभ तसेच दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सकाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभात सुमारे ३४०० योग साधक सहभागी झाले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, महिला यांच्यासह आबालवृद्धांचा समावेश होता.
संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार २१ जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज शिवाजी विद्यापीठाच्या लोककला सभागृहात हा कार्यक्रम सकाळी ६.३० ते ८ या वेळेत पार पडला. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून आजपर्यंत 'योगशक्ती - योगयज्ञ'अंतर्गत ३६५ दिवस योग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या योग उपक्रमास दैनंदिन २००हून अधिक साधकांनी लाभ घेतला. साधकांचा हा प्रतिसाद पाहता हे मोफत योग शिबीर पुढील वर्षभरही राबविण्याची घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली.
यावेळी कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामी, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, माणिकराव पाटील-चुयेकर, डॉ. संदीप पाटील यांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी सेवक उपस्थित होते. प्रशिक्षक दत्ता पाटील यांनी सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके साधकांकडून करवून घेतली.
यापुढील काळातही साधकांनी दररोज सकाळी ते ७.३० या कालावधीत विद्यापीठाच्या लोककला सभागृहात निरंतर मोफत योग शिबिराचा उत्तम आरोग्यासाठी जरुर लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे तसेच श्री काडसिध्देश्वर स्वामी यांनी केले.
प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागामार्फत जाणीव जागृती
शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ आणि निरंतर शिक्षण विस्तार कार्य विभागामार्फत दुसऱ्या जागतिक योग दिनानिमित्त लोकांमध्ये योगाचे जाणी जागृती व्हावी, यासाठी जाणी जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. झेड. पी. महालक्ष्मी हॉल, टाकाळा, कोल्हापूर येथे सकाळी ते या वेळेत मोफत कार ध्यान प्राणायाम शिबीर घेण्यात आले. २०० साधकांनी या शिबीराचा लाभ घेतला. शिबिरा प्रौढ आणि निरंतर शिक्षण विस्तार कार्य विभागाच्या प्र.संचालक विभागप्रमुख डॉ. सुमन बुवा यांच्यासह सोऽहं यो र्गाच्या सौ. विणा माल्डीकर शिक्षक यांनी सहभाग घेतला. प्रीती चव्हाण यांनी आभार मानले.