Monday, 6 April 2026

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग स्पर्धा २०२५-२६:

स्पर्धेवर पंजाबच्या विद्यापीठांचे वर्चस्व


शिवाजी विद्यापीठाच्या महिलांची लक्षवेधक कामगिरी

सांगली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय कॅनॉईंग स्पर्धेत पुरूषांच्या सी-२ गटातील १००० मीटर शर्यतीमधील एक क्षण

सांगली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय कयाकिंग स्पर्धेत महिलांच्या के-४ गटातील १००० मीटर शर्यतीमधील एक क्षण.

सांगली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय कॅनॉईंग स्पर्धेत पुरूषांच्या सी-२ गटातील १००० मीटर शर्यतीमधील एक क्षण

सांगली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय कयाकिंग स्पर्धेत महिलांच्या के-४ गटातील १००० मीटर शर्यतीमधील एक क्षण.

सांगली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय कयाकिंग स्पर्धेत महिलांच्या के-४ गटातील १००० मीटर शर्यतीमधील एक चुरशीचा क्षण.

(सांगली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनॉईंग व कयाकिंग स्पर्धेतील क्षणचित्रे दर्शविणारी लघुचित्रफीत.)



सांगली, दि. ६ एप्रिल: भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग (पुरुष व महिला) स्पर्धेत आज दुसऱ्या दिवसअखेर स्पर्धेत अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाने वर्चस्व प्राप्त केले. त्याखालोखाल मोहालीचे चंदीगड विद्यापीठ आणि चंदीगडचे पंजाब विद्यापीठ यांच्या क्रीडापटूंनीही लक्षवेधी कामगिरी केली. शिवाजी विद्यापीठाच्या महिलांनी के-१ (१००० मीटर), सी-१ (१००० मी.) आणि के-४ (१००० मी.) या स्पर्धांत चतुर्थ स्थान पटकावले.

येथील कृष्णा बोट क्लबमध्ये आज झालेल्या स्पर्धांत गुरू नानक देव विद्यापीठाने पुरुष गटातील के-२, सी-२ व के-४ आणि महिला गटातील के-१ व के-२मध्ये अव्वल कामगिरी केली. चंदीगड विद्यापीठानेही पुरुष व महिला गटातील के-२ व के-४ प्रकारात उत्तम कामगिरी नोंदवली. पंजाब विद्यापीठाने महिला गटातील सी-१ आणि सी-२ स्पर्धांत प्रथम क्रमांक मिळवला. लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाने पुरुष गटातील सी-१ मध्ये अव्वल येत उपस्थितांची वाहवा मिळवली.

स्पर्धेतील १००० मीटर अंतराच्या विविध गटांतील निकाल अनुक्रमे (कंसात विद्यापीठ व नोंदविलेली वेळ याप्रमाणे) असे:

पुरुष गट:

K1 (1000 मीटर) – वंश शर्मा (मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, राजस्थान, 03:41.35), थांगसंबाम डी. (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब, 03:48.15), मनवीर सिंह (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 03:49.82), अनोश बारला (बरकतुल्लाह विद्यापीठ, भोपाळ, 03:51.53),

C1 (1000 मीटर) –हर्ष पाल (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, 04:02.54), हर्ष शर्मा (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 04:11.89), प्रशांत चौधरी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 04:16.72), अभिषेक नवले (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, 04:21.86)

K2 (1000 मीटर) –आदित्य सिंह, सचिन (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 03:18.44), शुभम, मनवीर सिंह (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 03:18.95), वंश, देव चौधरी (चंदीगड विद्यापीठ, 03:30.43), प्रथमेश पाटील, निरंजन पाटील (भारती अभिमत विद्यापीठ, पुणे, 03:36.86)

C2 (1000 मीटर) – प्रिन्स गोस्वामी, हर्ष वर्मा (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 03:42.13), दर्शन मोरे, अल्पेश धुळे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, 03:45.33), सिद्धांत, अतुल (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 03:47.38)

K4 (1000 मीटर) – मयंक शर्मा व सहकारी (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 03:02.44), आदर्श बिजू व सहकारी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 03:06.70), प्रथमेश पाटील व सहकारी (भारती अभिमत विद्यापीठ, पुणे, 03:08.48), कृतिक कुमार व सहकारी (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 03:08.74).

महिला गट:

K1 (1000 मीटर) –चंद्रकला कुशवाहा (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 04:15.40), निधी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली 04:18.04), दिव्यांशी राघोरटे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरूप विद्यापीठ, नागपूर, 04:34.40), उर्वशी घुगरें (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 04:44.88)

C1 (1000 मीटर) - निक्की (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 04:45.83), रिया कुमारी (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा, 04:58.59), ओ. बिड्या लक्ष्मीदेवी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 05:00.38), प्रिया चव्हाण (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 05:19.94)

K2 (1000 मीटर) – मोनिका गढवाल, ह्रषिता, (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 04:04.04), निधी, पायल (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 04:15.41), दीप्ती, जस्मीन (पाँडिचेरी विद्यापीठ, पुदुच्चेरी, 04:24.78), अल्पना सानी, नंदिनी (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 04:27.89)

C2 (1000 मीटर) –प्रिया चौरसिया, रिशिका कुमारी एक्का (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 04:29.83), ऋतिका कुमारी, रिया (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा, 04:50.27), नीतू सपनवाने, मनमती बघेल (पं. रवीशंकर शुक्ला विद्यापीठ, रायपूर, 05:00.71)

K4 (1000 मीटर) – गरिमा व सहकारी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 03:42.76), भूमी सोनकर व सहकारी (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 03:50.15), अल्पना साहनी व सहकारी (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 04:00.74), उर्वशी घुगरे, आरती जाधव, शुहाना जमादार व निकिती मगदूम (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 04:13.23).

No comments:

Post a Comment