‘ए.आर.’ शैक्षणिक प्रणाली, ‘क्यू. आर.’ बॅंकिंग प्रणालीच्या औद्योगिक उपयोजनासाठी महत्त्वपूर्ण
कोल्हापूर, दि. १८ एप्रिल: शिवाजी
विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा समाजोपयोगी वापर व्हावा, या दृष्टीने
तिची सिद्धता होणे हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. त्याचा समाजाबरोबरच विद्यार्थ्यांनाही
लाभ मिळवून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव
यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण
स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि पुणे येथील एक्सलॉजिया टेक एलएलपी
यांच्यामध्ये विद्यापीठाने विकसित केलेल्या आभासी वास्तविकता (SUK-AR) शैक्षणिक प्रणालीतील डिजिटल अॅसेट्स आणि क्विक रिस्पॉन्स आधारित (QR based) बँकिंग प्रणालीचा वापर आणि वितरण यासाठी काल सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी त्या
बोलत होत्या.
यावेळी एक्सलॉजिया कंपनीचे शैलेश कोपर्डेकर म्हणाले, विद्यापीठाने विकसित केलेले नवोपक्रम आणि तंत्रज्ञान
प्रत्यक्ष उद्योग-व्यवसाय क्षेत्रापर्यंत पोहोचविणे
आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन
या करारासाठी पुढाकार घेतला. या समाजोपयोगी विद्यापीठीय संशोधनाचा समाज आणि उद्योग क्षेत्राला प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी नजीकच्या काळात प्रयत्न
करण्यात येतील.
यावेळी सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि श्री. कोपार्डेकर यांनी स्वाक्षरी केल्या. स्कूलचे संचालक डॉ. नितीन माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुधीर देसाई यांनी सामंजस्य कराराविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. वैशाली भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार, डॉ. परशुराम वडार, डॉ. तेजश्री मोहरेकर, डॉ. मनस्वी कोपार्डेकर व अभिजित जाधव उपस्थित होते.

No comments:
Post a Comment