Thursday, 23 April 2026

डॉ.श्रीकृष्ण महाजन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे गाढे अभ्यासक होते-प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव

 



कोेल्हापूर, दि.23 एप्रिल - शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता आणि वाणिज्य व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ.श्रीकृष्ण महाजन हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे गाढे अभ्यासक होते. विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्र आणि सामाजिक समावेशन केंद्रास त्यांनी भरीव योगदान दिले. मागील काही वर्षांपासून फुले, शाहू, आंबेडकर यांचा सप्ताह विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने डॉ.महाजन यांचा मोठा सहभाग होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण खऱ्या अर्थाने अंगी बाणावलेले एक शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यावर त्यांचा भर होता. शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा त्यांच्या कृतीमधून दिसून येतो. डॉ.महाजन यांनी कार्याच्या माध्यमातून विभागास राष्ट्रीय पातळीवर पुढे नेहले. एक सहृदयी आदर्श व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठाची, समाजाची आणि शैक्षणिक क्षेत्राची भरून येणारी हानी झाली आहे, अशी भावना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.श्रीकृष्ण महाजन यांचे अपघातामुळे निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आलेे.याप्रसंगी डॉ.जाधव बोलत होत्या.

           वाणिज्य व्यवस्थापन अधिविभागाचे डॉ.केदार मारूलकर म्हणाले, सकारात्मक विचार करताना विद्यार्थी आणि विद्यापीठ हीत यांचा कायम डॉ.महाजन विचार करीत असत. भविष्यातील शैक्षणिक सुधारणांबाबत ते नेहमी काळाच्या पुढे जाऊन विचार करीत आणि प्राधान्याने अंमलबजावणी करीत होते.

            कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी शोकप्रस्तावाचे वाचन केले.

यावेळी आजीवन अध्यासन केंद्राचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, नॅक विभागाचे डॉ.सागर डेळेकर, इतिहास अधिविभागाचे माजी अधिविभागप्रमुख डॉ.माधो पाटील, तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ.उदय पाटील,एमबीए अधिविभागप्रमुख डॉ.दिपा इंगवले, रसायनशास्त्र अधिविभागाचे डॉ.गोविंद कोळेकर, इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागप्रमुख डॉ.पवन गायकवाड, डॉ.मुरलीधर भानारकर, डॉ.किशोर खिलारे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष आनंदराव खामकर, उपकुलसचिव निवास माने, संशोधक विद्यार्थी यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

            याप्रसंगी परीक्षा मूल्यमापन केेंद्राचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव,क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.शरद बनसोडे, डॉ.अवनिश पाटील, डॉ.निशा मुढे, डॉ.राजेंद्र सोनकवडे, लेखा विभागाचे उपकुलसचिव प्रिया देशमुख यांचेसह विविध अधिविभागातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठयासंख्येने उपस्थित होते.

------

No comments:

Post a Comment