चंदीगड
विद्यापीठ उपविजेते;
शिवाजी विद्यापीठास अखेरच्या दिवशी दोन पदके
![]() |
| सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनॉईंग व कयाकिंग स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक स्वीकारताना अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाचा संघ. |
सांगली,
दि. ८ एप्रिल: शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठे महासंघ
(ए.आय.यू.) यांच्या संयुक्त विद्यमाने येथे पार पडलेल्या अखिल भारतीय
आंतरविद्यापीठ कॅनॉईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) अजिंक्यपद स्पर्धेत एकूण १९ पदके
प्राप्त करीत अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेत
चुरशीची लढत देणाऱ्या मोहालीच्या चंदीगड विद्यापीठाने उपविजेतेपद मिळविले आणि
चंदीगडच्या पंजाब विद्यापीठास तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यांनी
अनुक्रमे एकूण १८ व १५ पदके प्राप्त केली. सांगली येथील रॉयल कृष्णा बोट क्लब येथे
आज या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख
उपस्थितीत उत्साहात झाला.
दरम्यान, गेले चार दिवस विविध गटांत
चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी आज
अखेरच्या दिवशी २०० मीटर शर्यतीत आपला खेळ उंचावत दोन पदके प्राप्त केली.
पुरूषांच्या कयाकिंगमध्ये के-४ गटात रौप्य आणि महिलांच्या कॅनॉईंगमध्ये सी-२ गटात
कांस्य पदक पटकावले. महिलांच्या के-४ गटातही चौथे स्थान प्राप्त केले.
अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाने
स्पर्धेच्या सुरवातीपासून सर्वच गटांत आपले वर्चस्व कायम राखले. स्पर्धेत
सातत्यपूर्ण आणि सर्वांगीण कामगिरीच्या जोरावर एकूण ११ सुवर्ण, ८ रौप्य अशी एकूण १९ पदकांची कमाई करत त्यांनी अजिंक्यपद
पटकावले. मोहालीच्या चंदीगड विद्यापीठाने ६ सुवर्ण,
६ रौप्य व ६
कांस्य अशी एकूण १८ पदके प्राप्त करीत उपविजेतेपद मिळविले. चंदीगडच्या पंजाब
विद्यापीठाने ७ सुवर्ण, २
रौप्य व ६ कांस्य अशा एकूण १५ पदकांसह तृतीय स्थान पटकावले.
स्पर्धेत लव्हली प्रोफेशनल
विद्यापीठाने २ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्य अशी ८ पदके प्राप्त करीत चौथे,
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १ सुवर्ण ४ रौप्य व १ कांस्य अशी ६
पदके मिळवित पाचवे स्थान प्राप्त केले. गुरू काशी विद्यापीठ, केरळ विद्यापीठ यांनी
प्रत्येकी ४, पुण्याचे भारती अभिमत विद्यापीठ, मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ,
राजस्थान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी प्रत्येकी ३ पदके
प्राप्त केली.
यावेळी खासदार विशाल पाटील यांनी
महाराष्ट्रात या स्पर्धा प्रथमच भरविण्याचा सन्मान शिवाजी विद्यापीठाला
मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सांगलीकरांनी या स्पर्धा यशस्वी करून दाखवून
भविष्यातील या स्पर्धांमध्येही क्रीडापटूंना मोठी संधी असल्याचे दाखवून दिले असून या
स्पर्धेमुळे आता कॅनॉईंग व कयाकिंग या जलक्रीडा प्रकाराला केवळ पश्चिम
महाराष्ट्रातच नव्हे, तर राज्यभरात मोठी चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
या प्रसंगी स्पर्धा निरीक्षक डॉ. संदीप
शिंदे, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, पुण्याच्या
युवक सेना संचालनालयाचे उपसंचालक सुहास पाटील, सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी किरण
बोरवडेकर, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र
पवार, शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ
शिंदे, अधिसभा सदस्य धैर्यशील यादव, संजय
परमणे, काव्याश्री नलवडे, श्वेता
परुळेकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.
राजाराम गुरव, कास्ट्राईबचे आनंद खामकर, पंच
प्रतिनिधी मुकेश शर्मा, डॉ. सुनील चव्हाण, डॉ.
एन. डी. पाटील, प्रा. किरण पाटील, डॉ. मयूर सिंहासने,
डॉ. आकाश बनसोडे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहुल मगदूम, विजय रोकडे, संजय पाटील, डॉ. श्रीदेवी पवार,
दत्ता पाटील, डॉ. एन.आर. कांबळे, डॉ. धनंजय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी
क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अधिसभा
सदस्य विशाल गायकवाड यांनी आभार मानले.
सांगलीमध्ये प्रथमच होत असलेल्या या
स्पर्धांना क्रीडाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चितळे उद्योग
समूहाच्या वतीने सहभागी क्रीडापटूंना भेटवस्तू देण्यात आल्या.
तत्पूर्वी आज झालेल्या २०० मीटर
शर्यतींमध्ये पुरुष गटात चंदीगड विद्यापीठ, भारती विद्यापीठ, गुरू नानक देव
विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे, तर महिला गटात चंदीगड
विद्यापीठ आणि गुरू नानक देव विद्यापीठ या संघांचे वर्चस्व दिसून आले.
२०० मीटर शर्यतींचा अंतिम निकाल
अनुक्रमे (कंसात विद्यापीठ व नोंदविलेली वेळ याप्रमाणे) असा-
पुरुष
गट-
के-१ - राजेश
शेट्टी (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, 00:45.12),
योगेश सिंग (पाँडिचेरी विद्यापीठ पुद्दुचेरी, 00:46.18), निरंजन पाटील (भारती अभिमत
विद्यापीठ, 00:46.32),
अनोश बारला (बरकतुल्लाह विद्यापीठ, भोपाळ,
00:47.38),
सी-१ - प्रिन्स
गोस्वामी (गुरू नानक देव विद्यापीठ, 00:49.85), अनिकेत (लव्हली प्रोफेशन
विद्यापीठ, 00:50.85),
आधिनाथ ए. (केरळ विद्यापीठ, 00:52.41), मोहम्मद शोएब अली (कुरूक्षेत्र विद्यापीठ, 00:53.70)
के-२ - निरंजन
पाटील व प्रथमेश पाटील (भारती अभिमत विद्यापीठ, 00:41.46), लक्षवीर सिंग व विशाल
डांगी (गुरू नानक देव विद्यापीठ, 00:41.82), एन. निवास सिंग व रोहित (पंजाब
विद्यापीठ, चंदीगड, 00:42.45), वंश शर्मा व साहिल गायरी (मोहनलाल सुखाडिया
विद्यापीठ, उदयपूर, 00:43.79),
सी-२ - अल्पेश
धुळे व दर्शन मोरे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 00:41.85), अक्षय बी. व
मनिंदर सिंग (चंदीगड विद्यापीठ, मोहाली,
00:41.88), राजू कुमार व हर्षपाल (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, 00:44.39),
प्रतीक कसबे व दिव्यांग थोरात (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,
नाशिक, 00:48.24),
के-४ – आदर्श
बिजू व सहकारी (चंदीगड विद्यापीठ, 00:39.64), करण घुणके, स्वानंद आकिवाटे, अमेय
भुयेकर व श्रीसमर्थ सासणे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 00:40.83), अथर्व महाजन व
सहकारी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 00:41.55), साहील ग्यारी व सहकारी
(मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, उदयपूर, 00:42.93),
महिला
गट-
के-१ - गरिमा
(चंदीगड विद्यापीठ, 00:56.05),
चंद्रकला कुशवाहा (गुरू नानक देव विद्यापीठ, 00:56.48), आंद्रिया पॉलोज (केरळ विद्यापीठ, 00:57.52),
दिव्यांशी राघोरटे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, 00:59.76),
सी-१ - अनु
(पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 01:04.87),
विचित्रा गुप्ता (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, 01:08.63), ओ. बिद्यालक्ष्मी देवी (चंदीगड
विद्यापीठ, मोहाली, 01:08.85),
अनुष्का अंबेकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 01:09.03),
के-२ - निधी
व चंद्रकला कुशवाहा (गुरू नानक देव विद्यापीठ, 00:53.69), वंशिका व कुलसुम (चंदीगड विद्यापीठ,
00:56.68), आंद्रिया पॉलोज व देविका (केरळ विद्यापीठ, 00:58.33), दिव्यांशी राघोरटे व वैष्णवी अजबाळे
(राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, 00:58.37),
सी-२ - निक्की
व अनु (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 00:56.31),
अनुष्का अंबेकर व संस्कृती सिंगाडे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 01:01.56), प्रिया
चव्हाण व प्रतीक्षा खोत (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 01:05.82), लीना नागलवाडे व अपेक्षा हजारे (राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, 01:14.58),
के-४ – ह्रषिता व सहकारी (चंदीगड विद्यापीठ,
00:47.35), भूमी सोनकर व सहकारी (गुरू नानक देव विद्यापीठ, 00:48.70), कुसुम
गुप्ता व सहकारी (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 00:51.60), अपूर्वा पोकळे, समृद्धी
खोत, प्रणाली कोपार्डे व स्फूर्ती माने (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 00:52.65).
अंतिम
पदकतालिका पुढीलप्रमाणे-
|
विद्यापीठाचे नाव |
सुवर्ण |
रौप्य |
कांस्य |
एकूण पदके |
|
गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर |
११ |
८ |
० |
१९ |
|
चंदीगड विद्यापीठ, मोहाली |
६ |
६ |
६ |
१८ |
|
पंजाब विद्यापीठ, चंदीगड |
७ |
२ |
६ |
१५ |
|
लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब |
२ |
४ |
२ |
०८ |
|
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे |
१ |
४ |
१ |
०६ |
|
गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा |
० |
३ |
१ |
०४ |
|
केरळ विद्यापीठ, केरळ |
० |
१ |
३ |
०४ |
|
मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, उदयपूर |
१ |
१ |
१ |
०३ |
|
भारती अभिमत विद्यापीठ, पुणे |
१ |
० |
२ |
०३ |
|
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,
नागपूर |
० |
० |
३ |
०३ |
|
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर |
० |
१ |
१ |
०२ |
|
पंजाब विद्यापीठ, पतियाळा |
० |
१ |
१ |
०२ |
|
पं. रवीशंकर शुक्ला विद्यापीठ, रायपूर |
० |
० |
१ |
०१ |
|
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,
नाशिक |
० |
० |
१ |
०१ |

No comments:
Post a Comment